एक्स्प्लोर

Martha Reservation Update : 'माझ्या राजीनाम्याने मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार असेल तर मी उद्याच राजीनामा देतो' : खासदार संभाजीराजे छत्रपती 

माझ्या राजीनाम्याने मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार असेल तर मी उद्याच राजीनामा देतो, अशी उद्विग्न प्रतिक्रिया खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे. मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर त्यांनी राज्य दौरा सुरु केला असून आज ते सोलापुरात होते.

सोलापूर : माझ्या राजीनाम्याने मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार असेल तर मी उद्याच राजीनामा देतो, अशी  उद्विग्न प्रतिक्रिया खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे. मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर त्यांनी राज्य दौरा सुरु केला असून आज ते सोलापुरात होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की,  28 मे रोजी मुंबईत मुख्यमंत्री, विरोधीपक्षनेते यांच्यासोबत एकत्रित बैठक करणार आहोत. हा दौरा कोणत्याही सरकारविरोधात किंवा पक्षाविरोधात नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, ओबीसी समाजाचे ज्येष्ठ लोक भेटले त्यांनी मला चांगला मार्ग सांगितला. मराठा समाजाची दिशाभूल होऊ नये यासाठी दौरा करतोय.  लोकांना काय वाटतेय यापेक्षा कायदा काय आहे हे पाहणे गरजेचे आहे. त्याचा अभ्यास करण्यासाठीच मी हा दौरा सुरु केलाय, असं ते म्हणाले. 

ते म्हणाले की, राज्य आणि केंद्र सरकारने काय भूमिका घ्यायची ते पहावे लागेल. सारथी संस्थेची दुरवस्था किंवा वसतिगृहाचे प्रश्न प्रलंबित आहेत त्याचे काम राज्याने करावे, असंही  खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले. 

त्यांनी म्हटलं की, माझी भूमिका पक्षाची नाही तर समाजाची आहे. घराण्याचा वंशज म्हणून समाजाचा घटक म्हणून मी भूमिका घेतोय. या विषयावर भारताच्या इतिहासात संसदेत पहिल्यांदा आंदोलन करणारा मी पहिला खासदार आहे, असंही ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालाने सांगितले आहे सप्टेंबर 2020 पुर्वीच्या नियुक्त्या राज्य सरकारने कराव्यात, असंही त्यांनी सांगितलं.

राज्यातील काही भागांचा दौरा करणार

मराठा समाजाची भूमिका आणि समाजाचे प्रश्न जाणून घेण्यासाठी आपण राज्यातील काही भागांचा दौरा करणार आहोत, असं खासदार संभाजीराजे छत्रपतींनी सांगितलं आहे. तसेच मराठा आरक्षण प्रश्नाविषयी मुख्यमंत्र्यांशीही चर्चा केली जाईल, असंही ते म्हणाले. 27 मे रोजी खासदार संभाजीराजे मुंबईत असणार आहेत. त्यादिवशी सकाळी किंवा दुसऱ्या दिवशी संभाजीराजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चेची शक्यता आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे. कोरोना संकटात जीव महत्त्वाचा आहे. त्यामुळे मराठा समाजानं संयम बाळगावा असं आवाहन त्यांनी पुन्हा एकदा केलं आहे. 

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking LIVE: सोनम वांगचुक यांना 'जंतर मंतर'वरुन हटवलं, दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई
Maharashtra Breaking LIVE: सोनम वांगचुक यांना 'जंतर मंतर'वरुन हटवलं, दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई
NEET Exam Paper: रात्रंदिवस अभ्यास केला, आजारी पडला, जेवलाही नाही, कित्येक रात्री...; 522 गुण मिळणे अपेक्षित, मात्र स्कोर कार्डवर अवघे 95 गुण, बीडच्या सोहमच्या आई वडिलांचा संताप
रात्रंदिवस अभ्यास केला, आजारी पडला, जेवलाही नाही, कित्येक रात्री...; 522 गुण मिळणे अपेक्षित, मात्र स्कोर कार्डवर अवघे 95 गुण, बीडच्या सोहमच्या आई वडिलांचा संताप
MP Merger : ठाकरे गटाचे 6 अन् ममता बॅनर्जींचे 20 बंडखोर खासदार, लोकसभा अध्यक्ष आज विलीनीकरणावर अंतिम निर्णय देणार?
ठाकरे गटाचे 6 अन् ममता बॅनर्जींचे 20 बंडखोर खासदार, लोकसभा अध्यक्ष आज विलीनीकरणावर अंतिम निर्णय देणार?
Ashok Kharat: अशोक खरातविरोधात ईडीचे तब्बल 3000 पानांचे आरोपपत्र; रिमोटचा साप, 2 लाखांची चिंचेची बी ते 142 बेनामी खात्यांचा पर्दाफाश
अशोक खरातविरोधात ईडीचे तब्बल 3000 पानांचे आरोपपत्र; रिमोटचा साप, 2 लाखांची चिंचेची बी ते 142 बेनामी खात्यांचा पर्दाफाश

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk Wife : दिल्ली पोलिसांनी बळजबरीने सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं; आता पत्नीने मौन सोडलं, म्हणाल्या, 'माझ्या संमतीशिवाय....
दिल्ली पोलिसांनी बळजबरीने सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं; आता पत्नीने मौन सोडलं, म्हणाल्या, 'माझ्या संमतीशिवाय....
देशात संतापाचा उद्रेक, मागण्यांवर चर्चा नाही, बळाच्या जोरावर जंतर मंतरवरून आंदोलन मोडीत काढलं; सोनम वांगचूकना सकाळीच उचलल्यानंतर विरोध करणाऱ्या आंदोलकांना सुद्धा हाकललं
देशात संतापाचा उद्रेक, मागण्यांवर चर्चा नाही, बळाच्या जोरावर जंतर मंतरवरून आंदोलन मोडीत काढलं; सोनम वांगचूकना सकाळीच उचलल्यानंतर विरोध करणाऱ्या आंदोलकांना सुद्धा हाकललं
BCCI On Rohit Sharma Retirement: रोहित शर्मा 2027 च्या वर्ल्डकपआधीच वनडेमधून निवृत्ती घेणार? काय खरं, काय खोटं? BCCI नं स्पष्टच सांगितलं...
रोहित शर्मा 2027 च्या वर्ल्डकपआधीच वनडेमधून निवृत्ती घेणार? काय खरं, काय खोटं? BCCI नं स्पष्टच सांगितलं...
Sonam Wangchuk Hunger Strike: दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरून का हटवले? अखेर समोर आलं मोठं कारण
दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरून का हटवले? अखेर समोर आलं मोठं कारण
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे, राम रक्षा कवच त्यांच्या कामाचं नाही, श्राप...'
उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे, राम रक्षा कवच त्यांच्या कामाचं नाही, श्राप...'
Nashik Crime News: नाशकात PG मध्ये राहणाऱ्या तरुणीला भररस्त्यात संपवलं; कायद्याच्या बालेकिल्ल्यात धक्कादायक घटना!
नाशकात PG मध्ये राहणाऱ्या तरुणीला भररस्त्यात संपवलं; कायद्याच्या बालेकिल्ल्यात धक्कादायक घटना!
Maharashtra Weather Update : राज्यातील पावसाबाबत मोठी अपडेट; चार दिवस कोकणसह घाटमाथ्यावर मुसळधार, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाता अंदाज
राज्यातील पावसाबाबत मोठी अपडेट; चार दिवस कोकणसह घाटमाथ्यावर मुसळधार, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाता अंदाज
Abhijeet Dipke : सोनम वांगचूक यांना 'जंतर मंतर'वरुन दिल्ली पोलिसांनी हटवलं, अभिजीत दीपके यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
सोनम वांगचूक यांना 'जंतर मंतर'वरुन दिल्ली पोलिसांनी हटवलं, अभिजीत दीपके यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले "आंदोलकांना मारहाण अन् बळजबरीने..."
Embed widget