एक्स्प्लोर

संघटना सांगेल तेव्हा सदाभाऊंना सत्ता सोडावी लागेल : राजू शेट्टी

सांगली: ‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सांगितल्यानंतर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना सरकारमधून बाहेर पडावंच लागेल.’ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. ‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते बोलत होते. सदाभाऊंनी आपल्या मुलाला तिकीट देऊन त्यांनी पक्षात घराणेशाही आणली असा आरोपही राजू शेट्टींनी केला आहे. मी सदाभाऊच्या मुलाच्या प्रचारासाठी जाणार नाही असं सांगायलाही राजू शेट्टी विसरले नाहीत. त्यामुळे येत्या काळात राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यात वाद रंगण्याची चिन्ह आहेत. राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर खोतने वाळवा तालुक्यातील बागणी जिल्हा परिषद गटातून रयत विकास आघाडीच्या माध्यमातून अर्ज भरला. त्यामुळे आता राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर घराणेशाहीची टीका केली आहे. 'भाजपकडून मित्राचं घर फोडण्याचा प्रयत्न' 'नेमकं कधी पडणार हे सांगता येणार नाही, पण भाजपची सध्याची वाटचाल आणि मित्रपक्षाबरोबरचं वागणं बघता, कधीतरी या निर्णयापर्यंत जावं लागेल. स्वाभिमानीतील नाराज लोकांना भेटा त्यांना उमेदवारीचं आमिष दाखवा. असे प्रकार भाजपकडून सुरु आहेत. म्हणजे जणू काही मित्राचंच घर फोडण्याचा प्रकार सुरु आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये स्वाभिमानीकडे तगडे उमेदवार होते. त्यामुळे काही जणांना थांब म्हणावं लागतं. अशा लोकांना भेटून त्यांना भाजपकडून उमेदवारी देण्याची आश्वासनं दिली गेली.' असं राजू शेट्टी म्हणाले. 'संघटना सांगेल तेव्हा सदाभाऊंना सत्तेतून बाहेर पडावं लागेल' 'संघटना की सत्ता असा जेव्हा प्रश्न येईल त्यावेळी सदाभाऊंना यांना त्यापैकी एकाची निवड करावी लागेल. संघटना सांगेल तेव्हा सदाभाऊंना सत्ता सोडावी लागेल. सदाभाऊ हे चळवळीतून आले आहेत. त्यामुळे असा जेव्हा प्रसंग येईल त्यावेळी ते नक्कीच संघटनेला महत्व देखील अशी आशा आहे.' असंही राजू शेट्टी म्हणाले. VIDEO: संबंधित बातम्या: सदाभाऊंचा मुलगा राजकीय आखाड्यात, थेट जयंत पाटलांशी टक्कर

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: MPSC च्या औषध निरीक्षक पदाच्या पेपर फुटीप्रकरणी 3 अधिकाऱ्यांसह 6 जणांना बेड्या
Maharashtra Live News Updates: MPSC च्या औषध निरीक्षक पदाच्या पेपर फुटीप्रकरणी 3 अधिकाऱ्यांसह 6 जणांना बेड्या
Gold Silver Price Today : सोने-चांदीच्या दरातील तेजीला ब्रेक; गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात तीन हजार रुपयांची घसरण, तर चांदीचे दरही गडगडले
सोने-चांदीच्या दरातील तेजीला ब्रेक; गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात तीन हजार रुपयांची घसरण, तर चांदीचे दरही गडगडले
तर सिलेंडरसाठी जास्त किंमत मोजावी लागू शकते, बुकिंगला सुद्धा अडचण येण्याची चिन्हे; ई-केवायसी आताच करा, अंतिम मुदतीची तारीख किती दिवसांनी वाढवली?
तर सिलेंडरसाठी जास्त किंमत मोजावी लागू शकते, बुकिंगला सुद्धा अडचण येण्याची चिन्हे; ई-केवायसी आताच करा, अंतिम मुदतीची तारीख किती दिवसांनी वाढवली?
Nagpur Student Protest: नागपुरातील अप्पर आदिवासी आयुक्त कार्यालयात विद्यार्थ्यांचा ठिय्या; थेट मुख्यमंत्र्यांकडे रोख, म्हणाले, आंदोलनाकडे लक्ष घाला, अन्यथा आमच्या...
नागपुरातील अप्पर आदिवासी आयुक्त कार्यालयात विद्यार्थ्यांचा ठिय्या; थेट मुख्यमंत्र्यांकडे रोख, म्हणाले, आंदोलनाकडे लक्ष घाला, अन्यथा आमच्या...

व्हिडीओ

Narhari Zirwal On Adivasi Students Protest: खाऊन पिऊन आंदोलन करा, मी जे आंदोलन करायचो ते चोरून खायचं
Rohit Pawar & Rahul Gandhi Meet : रोहित आणि राहुल कशाची चाहूल? | ABP Majha Special Report
MPSC Paper Leak Case : MPSC पेपरफुटीची भन्नाट लव्हस्टोरी Special Report
Laxman Hake On OBC Andolan : ओबीसींच्या आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन, सुरुवात कुठून? हाकेंनी सांगितलं
Sanjay Raut Mumbai PC : अमित शाहांसोबत देवेंद्र फडणवीस सुद्धा काम करायला तयार नाहीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटलांकडे ओबीसी प्रमाणपत्र, सुप्रिया सुळेंनी सुद्धा काढून ठेवलं, सर्वच मोठ्या मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र; विजय वडेट्टीवारांचा आरोप
मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटलांकडे ओबीसी प्रमाणपत्र, सुप्रिया सुळेंनी सुद्धा काढून ठेवलं, सर्वच मोठ्या मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र; विजय वडेट्टीवारांचा आरोप
Nashik Crime News: पत्नी अन् वडिलांना शेवटचा मेसेज केला; पहाटेच्या सुमारास गोदावरी नदीच्या पात्रात उडी घेतली, नाशिकमध्ये तरुणाचं टोकाचं पाऊल
पत्नी अन् वडिलांना शेवटचा मेसेज केला; पहाटेच्या सुमारास गोदावरी नदीच्या पात्रात उडी घेतली, नाशिकमध्ये तरुणाचं टोकाचं पाऊल
तर सिलेंडरसाठी जास्त किंमत मोजावी लागू शकते, बुकिंगला सुद्धा अडचण येण्याची चिन्हे; ई-केवायसी आताच करा, अंतिम मुदतीची तारीख किती दिवसांनी वाढवली?
तर सिलेंडरसाठी जास्त किंमत मोजावी लागू शकते, बुकिंगला सुद्धा अडचण येण्याची चिन्हे; ई-केवायसी आताच करा, अंतिम मुदतीची तारीख किती दिवसांनी वाढवली?
Nepal Flash Flood: नेपाळमधील प्रलयात आतापर्यंत 165 जणांचा अंत, 133 भारतीयांसह 1100 बेपत्ता; तब्बल दीडशे किमी दूर 33 मृतदेह सापडले; दुर्घटनेतील सर्वात धक्कादायक कारण समोर
नेपाळमधील प्रलयात आतापर्यंत 165 जणांचा अंत, 133 भारतीयांसह 1100 बेपत्ता; तब्बल दीडशे किमी दूर 33 मृतदेह सापडले; दुर्घटनेतील सर्वात धक्कादायक कारण समोर
Rule Change From 1st September: LPG गॅस सिलेंडर बुकिंगपासून ते एफडी अन् आयटीआरपर्यंत..; 1 सप्टेंबरपासून बदलणार 'हे' पाच मोठे नियम, तुमच्या खिशावरही होईल परिणाम
LPG गॅस सिलेंडर बुकिंगपासून ते एफडी अन् आयटीआरपर्यंत..; 1 सप्टेंबरपासून बदलणार 'हे' पाच मोठे नियम, तुमच्या खिशावरही होईल परिणाम
Jalgaon News: चिमुरडा झोका खेळताना गळ्याला दोरीचा फास लागला; आईनं घरात आल्यावर पाहिलं अन्..., जळगावमध्ये घडली हदयद्रावक घटना
चिमुरडा झोका खेळताना गळ्याला दोरीचा फास लागला; आईनं घरात आल्यावर पाहिलं अन्..., जळगावमध्ये घडली हदयद्रावक घटना
Nagpur Student Protest: नागपुरातील अप्पर आदिवासी आयुक्त कार्यालयात विद्यार्थ्यांचा ठिय्या; थेट मुख्यमंत्र्यांकडे रोख, म्हणाले, आंदोलनाकडे लक्ष घाला, अन्यथा आमच्या...
नागपुरातील अप्पर आदिवासी आयुक्त कार्यालयात विद्यार्थ्यांचा ठिय्या; थेट मुख्यमंत्र्यांकडे रोख, म्हणाले, आंदोलनाकडे लक्ष घाला, अन्यथा आमच्या...
Pimpri Chinchwad : मध्यरात्रीच्या सुमारास चेंबरमध्ये अडकून दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील घटना, नागरिकांमधून तीव्र संताप, नेमकं काय घडलं?
मध्यरात्रीच्या सुमारास चेंबरमध्ये अडकून दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील घटना, नागरिकांमधून तीव्र संताप, नेमकं काय घडलं?
Embed widget