Ashok Chavan : गावागावात ओबीसी (OBC) आणि मराठा (Maratha) यांच्यामध्ये वाद निर्माण झाला आहे. तो वाढू नये. तो महाराष्ट्राचा हिताचा नाही यासाठी समनव्याची भूमिका मी घेत असल्याचे भाजपचे खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) म्हणाले. मनोज जरांगे यांच्यासोबत काल झालेल्या भेटी संदर्भात मी आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी देखील चर्चा करणार असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले. मराठा आरक्षणची मागणी आहे. गुन्हे मागे घेण्यासंदर्भातला विषय आहे. तो बऱ्यापैकी मार्गी लागला असल्याची प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली. 


राज्यसभेत मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करणार 


राज्यसभेत सुद्धा मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करणार असल्याची प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली आहे. गावागावात ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये वाद निर्माण झाला आहे. तो वाढू नये, तो महाराष्ट्राच्या हिताचा नाही असे अशोक चव्हाण म्हणाले. 


अशोक चव्हाण आणि खासदार संदीपान भुमरेंनी दोन तास मनोज जरांगे यांच्याशी केली चर्चा


भाजपचे राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) आणि शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरे यांनी अंतरवाली सराटीमध्ये जात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. अशोक चव्हाण आणि मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या सरपंचाच्या घरी झालेल्या भेटीत तब्बल दोन तास चर्चा झाली. दरम्यान, चर्चा झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भेटीत काय काय घडलं हे त्यांनी सांगितलं आहे. 


महत्वाच्या बातम्या:


Ashok Chavan Meets Manoj Jarange Patil : अशोक चव्हाण-मनोज जरांगे पाटलांमध्ये तब्बल दोन तास चर्चा, सरपंचाच्या घरी झालेल्या भेटीत काय काय ठरलं?