Manoj Jarange Patil on Chhagan Bhujbal : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या मराठा आरक्षण (Maratha Reservation) शांतता रॅलीला आज हिंगोलीतून (Hingoli) सकाळी साडेअकरा वाजता सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर हिंगोलीत जरांगेंच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. अंतरवाली सराटीतून हिंगोलीकडे रवाना होण्याआधी मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 


शांतता रॅली भंग करण्याचा प्रयत्न भुजबळ करतील


मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठा आरक्षण शांतता रॅलीला आज हिंगोलीपासून सुरुवात होत आहे. मराठा ताकदीने एकत्र येणार आहे. आम्ही सरकारला जागे करण्याचा प्रयत्न करणार आहे. शांतता रॅली भंग करण्याचा प्रयत्न भुजबळ करतील. त्यांनी याआधीही असे केले आहे. आमच्या पुढे आंदोलन करणे, सभा घेणे. आम्ही जे करत आहोत तेच करणे. मात्र, परिस्थिती बिघडल्यास त्याला जबाबदार छगन भुजबळ, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असतील, अशी टीका त्यांनी यावेळी छगन भुजबळांवर केली आहे. शांतता रॅली सुरू असली तरी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू आहेत. 123 जागा शोधल्या आहेत. पाचव्या टप्यात मुंबईत रॅली काढणार आहे. फडणवीस म्हणतात काँग्रेसने आरक्षण दिले नाही, त्यांनी दिलं नाही म्हणून तुम्ही द्या, असेही त्यांनी म्हटले आहे.  


आंदोलक म्हणून आशा बाळगणे माझे कर्तव्य 


मराठा आंदोलक मनोज जरांगे हे मराठवाडा दौऱ्यासाठी अंतरवाली सराटीतून रवाना झालेत. आज मनोज जरांगे पाटील हिंगोली दौऱ्यावर असून त्यांच्या उपस्थितीत हिंगोलीत आज मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली निघणार आहे. एकटाच्या लढण्यात आणि करोडोंच्या लढण्यात खूप शक्ती असते. त्यामुळे मराठा समाजाने या शांतता रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जरांगे यांनी केलंय. आंदोलक म्हणून आशा बाळगणे माझे कर्तव्य असून आम्ही 13 तारखेपर्यंत सरकारवर आशा ठेवून असल्याचं जरांगे म्हणालेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रासह अंतरवाली सराटी मधील सर्व गुन्हे मागे घेतील, असा आम्हाला विश्वास आहे. राजकीय इच्छा शक्ती असली तर 7 दिवस नाही, 2 तासात कायदेशीर टिकणारे निर्णय होऊ शकतात, असेही जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. 


'असा' असेल मनोज जरांगे पाटलांच्या रॅलीचा मार्ग


छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा - पोस्ट ऑफिस रोड - आखरे मेडिकल - खुराना पेट्रोल पंप चौक महात्मा गांधी चौक - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा (बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करतील) - महात्मा गांधीजींचा पुतळा (महात्मा गांधीजींना अभिवादन करतील) - पुढे इंदिरा गांधी चौक इंदिरा गांधी चौकामध्ये जरांगे यांचं समारोपीय भाषण. 


आणखी वाचा


Ashok Chavan Meets Manoj Jarange Patil : अशोक चव्हाण-मनोज जरांगे पाटलांमध्ये तब्बल दोन तास चर्चा, सरपंचाच्या घरी झालेल्या भेटीत काय काय ठरलं?