एक्स्प्लोर

राफेल घोटाळ्याप्रकरणी पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा : अशोक चव्हाण

राफेल घोटाळ्याप्रकरणी पंतप्रधान आणि संरक्षणमंत्री यांनी राजीनामे द्यावे, या मागणीसाठी काँग्रेस 27 सप्टेंबर रोजी मुंबईत मोर्चा काढणार असल्याची अशोक चव्हाण यांनी दिली.

मुंबई : राफेल विमान खेरदी हा देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा असून फ्रान्सच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी यावर शिक्कामोर्तब केले आहे. संसदेत आणि संसदेबाहेर राफेल करारावर वारंवार खोटे बोलून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांनी संसदेची आणि देशातील 130 कोटी जनतेची फसवणूक आणि विश्वासघात केला आहे. तसेच देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर लढणाऱ्या सैनिकांचा अवमान केला आहे.

पंतप्रधान मोदी आणि संरक्षणमंत्र्यांनी तात्काळ आपल्या पदाचे राजीनामे द्यावेत. तसेच संयुक्त संसदीय समितीमार्फत या घोटाळ्याची चौकशी करावी अशी मागणी अशोक चव्हाण यांनी यावेळी केली. या मागणीसाठी काँग्रेस 27 सप्टेंबर रोजी मुंबईत मोर्चा काढणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

राष्ट्रीय सुरक्षेला ढाल बनवून मोदी राफेल घोटाळा लपवण्याचा प्रयत्न करत आहेत, हे दुर्दैवी आहे. मोदींचा भ्रष्ट चेहरा या प्रकरणातून समोर आला आहे. 'चौकीदार ही भागीदार है' हे सिध्द झाले आहे.

पत्रकारपरिषदेत बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, मोदींना देशहितापेक्षा त्यांच्या उद्योगपती मित्रांचा फायदा महत्त्वाचा आहे. मोदी त्यांच्या उद्योगपती मित्रांच्या फायद्यासाठीच देश चालवत आहेत, हे पुन्हा एकदा राफेल घोटाळ्यावरून सिध्द झाले आहे. देशाच्या सैनिकांची सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षेला बाजूला ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनिल अंबानींच्या फायद्यासाठीच राफेल डील बदलली हे स्पष्ट झाले आहे.

काँग्रेस सरकारने एका राफेल विमानाची किंमत 526.10 कोटी निश्चित केली होती, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुनी डील रद्द करून राफेल विमानाची किंमत 1670.7 कोटी ठरवून राफेल खरेदीचा करार केला. या नव्या डीलमध्ये 41 हजार 205 कोटी रूपये जास्त मोजले. या बदल्यात अनिल अंबानी यांच्या रिलायन्स डिफेन्स या 10-12 दिवसांपूर्वी स्थापन झालेल्या कंपनीला 30 हजार कोटींचे कंत्राट दिलं गेलं.

संबंधित बातम्या

फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष मोदींना चोर म्हणाले, राहुल गांधींचा आरोप

राफेल विमान करार : भारताने फक्त रिलायन्सचं नाव सुचवलं : ओलांद

काँग्रेस-भाजप वादात कळीचा मुद्दा ठरलेला राफेल करार काय आहे?

महत्त्वाच्या बातम्या

परफ्युम खरेदी न केल्याने फेरीवाल्यांकडून युवक-युवतीला मारहाण; तरुणीचा टी-शर्ट फाडून अश्लील शिवीगाळ, दोघांना अटक
परफ्युम खरेदी न केल्याने फेरीवाल्यांकडून युवक-युवतीला मारहाण; तरुणीचा टी-शर्ट फाडून अश्लील शिवीगाळ, दोघांना अटक
Satara Result 2026: सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपने 9 जागा जिंकल्या, पण रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या भावाचा पराभव, अध्यक्षपदासाठी पुन्हा रस्सीखेच होणार
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपने 9 जागा जिंकल्या, पण रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या भावाचा पराभव, अध्यक्षपदासाठी पुन्हा रस्सीखेच होणार
राम पूर्णेकरांच्या जिवीताला धोका, कुटुंबीयांना पोलीस संरक्षण वाढवून द्या; मिनाक्षी शिंदेंचंच पोलीस आयुक्तांना पत्र
राम पूर्णेकरांच्या जिवीताला धोका, कुटुंबीयांना पोलीस संरक्षण वाढवून द्या; मिनाक्षी शिंदेंचंच पोलीस आयुक्तांना पत्र
NCP Leader Amit Shah Meeting: दिल्लीत राष्ट्रवादीचे नेते अन् अमित शाहांमध्ये खलबतं; गृहमंत्र्यांकडून महत्त्वाचे निर्देश, विलिनीकरणाबाबतही मोठं आश्वासन
दिल्लीत राष्ट्रवादीचे नेते अन् अमित शाहांमध्ये खलबतं; गृहमंत्र्यांकडून महत्त्वाचे निर्देश, विलिनीकरणाबाबतही मोठं आश्वासन

व्हिडीओ

Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report
Dia Mirza vs BMC on Diwali Pollution : व्हिडीओवरून कुरबूर बीएमसीत 'मिर्झा'पूर Special Report
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thane Crime News: डोंबिवलीत मित्रानेच मित्राला संंपवलं, 20 दिवस बॉडी लपवली, पण मेलेल्या मित्राने स्वप्नात येऊन हैराण केलं, अखेर पोलिसांकडे जाऊन कबुली दिली
डोंबिवलीत मित्रानेच मित्राला संंपवलं, 20 दिवस बॉडी लपवली, पण मेलेल्या मित्राने स्वप्नात येऊन हैराण केलं, अखेर पोलिसांकडे जाऊन कबुली दिली
परफ्युम खरेदी न केल्याने फेरीवाल्यांकडून युवक-युवतीला मारहाण; तरुणीचा टी-शर्ट फाडून अश्लील शिवीगाळ, दोघांना अटक
परफ्युम खरेदी न केल्याने फेरीवाल्यांकडून युवक-युवतीला मारहाण; तरुणीचा टी-शर्ट फाडून अश्लील शिवीगाळ, दोघांना अटक
Chhaya Kadam on Ravi Jadhav: 'नटरंग' नंतर रवी जाधवांचा येतोय नवा सिनेमा, 'फुलवारा'ची जादू भुरळ घालणार; व्हिडिओ शेअर करत छाया कदमांची दाद
'नटरंग' नंतर रवी जाधवांचा येतोय नवा सिनेमा, 'फुलवारा'ची जादू भुरळ घालणार; व्हिडिओ शेअर करत छाया कदमांची दाद
Satara Result 2026: सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपने 9 जागा जिंकल्या, पण रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या भावाचा पराभव, अध्यक्षपदासाठी पुन्हा रस्सीखेच होणार
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपने 9 जागा जिंकल्या, पण रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या भावाचा पराभव, अध्यक्षपदासाठी पुन्हा रस्सीखेच होणार
राम पूर्णेकरांच्या जिवीताला धोका, कुटुंबीयांना पोलीस संरक्षण वाढवून द्या; मिनाक्षी शिंदेंचंच पोलीस आयुक्तांना पत्र
राम पूर्णेकरांच्या जिवीताला धोका, कुटुंबीयांना पोलीस संरक्षण वाढवून द्या; मिनाक्षी शिंदेंचंच पोलीस आयुक्तांना पत्र
NCP Leader Amit Shah Meeting: दिल्लीत राष्ट्रवादीचे नेते अन् अमित शाहांमध्ये खलबतं; गृहमंत्र्यांकडून महत्त्वाचे निर्देश, विलिनीकरणाबाबतही मोठं आश्वासन
दिल्लीत राष्ट्रवादीचे नेते अन् अमित शाहांमध्ये खलबतं; गृहमंत्र्यांकडून महत्त्वाचे निर्देश, विलिनीकरणाबाबतही मोठं आश्वासन
Maharashtra District bank Election Result 2026: सातारा आणि सांगली, अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नवे कारभारी कोण? वाचा नव्या संचालकांची संपूर्ण यादी
सातारा आणि सांगली, नगर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नवे कारभारी कोण? वाचा नव्या संचालकांची संपूर्ण यादी
IND vs NZ पहिल्या वनडेआधी सराव सत्रात काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना... स्टार फलंदाज डेव्हन कॉनवे थेट हॉस्पिटलमध्ये, नेमकं काय घडलं?
IND vs NZ पहिल्या वनडेआधी सराव सत्रात काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना... स्टार फलंदाज डेव्हन कॉनवे थेट हॉस्पिटलमध्ये, नेमकं काय घडलं?
Embed widget