सुमित्रा गंगाप्पा जुट्टी ह्या प्रसूतीसाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. त्यानंतर शनिवारी त्यांनी एका मुलीला जन्म दिला, मात्र त्यानंतर काही वेळाने तिने आपल्या या नवजात मुलीचा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती त्या ठिकाणी वार्डमध्ये असणाऱ्या एका महिलेने, डॉक्टरांना दिली. डॉक्टरांनी परिचारिकेला पाठवून त्या नवजात अर्भकाची तपासणी करण्यास सांगितले असता, त्या मुलीच्या गळ्यावर व्रण आढळून आले. त्यांनतर रुग्णालय प्रशासनाकडून त्या मुलीवर उपचार सुरू करण्यात आले होते मात्र रविवारी रात्रीच्या सुमारास त्या नवजात मुलीचा मृत्यू झाला आहे.
अवघ्या 41 तासापूर्वी जन्मलेल्या मुलीचा तिच्याच आईनेच गळा आवळून निष्ठुरपणे खून केल्याच्या धक्कादायक घटनेने रुग्णालयात हादरून गेले आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात सुमित्रा गंगाप्पा जुट्टी या निर्दयी मातेवर स्वतःच्या मुलीचा खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही महिला दोन तीन दिवसांपूर्वी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल झाली होती. शनिवारी तिने एका गोंडस कनेल्या जन्म दिला. मात्र या लेकीच्या भाळी मात्र अवघ्या काही तासांत मृत्यू लिहला होता. तोही जिने जन्म दिला त्याच आईच्या हातून. या बातमीने संपूर्ण विश्रामबाग पोलिस ठाणे हादरून गेले. पोलिसांनी तत्काळ शासकीय रुग्णालयात धाव घेतली. या महिलेकडे कसून चौकशी सुरु आहे.
VIDEO | दिवसभरातील 50 महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा | सुपरफास्ट बातम्या