एक्स्प्लोर
डोक्यात दगडी पाटा टाकून आईकडून तरुण मुलीची हत्या
अहमदनगर : डोक्यात दगडी पाटा टाकून आईनं तरुण मुलीची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे. कौटुंबिक वादातून हत्येचा संशय व्यक्त केला जातो आहे.
बोल्हेगाव परिसरात दुपारी कौटुंबिक कारणातून माय लेकींच्यात वाद झाला. दुपारी वडील आणि भाऊ दोघंही घराबाहेर होते. त्यावेळी दोघींच्यात कडाक्याचा वाद झाल्यानं उषा कोतेनं मोनिकाच्या डोक्यात पाटा घातला. गंभीर दुखापत झाल्यानं मोनिकाचा मृत्यू झाला.
मोनिकाच्या हत्येक प्रकरणी आई उषा कोतेला अटक करण्यात आली आहे. फिर्यादीत मानसिक संतुलन बिघडल्यानं हत्या झाल्याचं म्हटलं आहे. मात्र, हत्येचं खरं कारण अद्याप समोर आलं नाही. तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement