एक्स्प्लोर

रस्त्यावर धावणारी नाशिक मेट्रो पाहिलीत का?

नाशिक महापालिकाची सत्ता हाती घेतल्यानंतर पुणे-नागपूर पाठोपाठ नशिकमध्ये मेट्रो धावेल, असं आश्वासन मुख्यमंत्रीनी दिलं होतं. त्या दृष्टीने व्यवहार्यता तपासणी पूर्ण झाली.

नाशिक : मुंबईत मेट्रो धावली, पुणे-नागपुरातही मेट्रोची कामं वेगाने सुरु आहेत. आता विधानसभा निवडणुकीच्या आधी नाशिकच्या मेट्रोसेवेच्या कामाचा शुभारंभ करण्याच्या हालचालीही सुरु झाल्या आहेत. शहरात 31 किलोमीटर रस्त्याची व्यवहार्यता तपासणी झाली असून दोन ते तीन महिन्यांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. मात्र ही मेट्रो रेल्वे नसून टायर बेस मेट्रो म्हणजेच आर्टिक्युलेटेड बस असेल. त्यामुळे मेट्रोच्या नावाखाली नाशिककरांची फसवणूक होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. नाशिकचे पालकत्व स्वीकारलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नाशिककरांना लवकरच मेट्रोचं गिफ्ट मिळणार आहे. मंत्रभूमी असणारी नाशिकनगरी  मेट्रोसिटी म्हणून ओळखली जाणार आहे. लोकसभा निवडणुकीतील घवघवीत यशानंतर भाजप सरकारने आगामी विधानसभा निवडणुकांकडे लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यामुळे दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याकडे राज्य सरकारचा कल दिसत आहे. नाशिक महापालिकाची सत्ता हाती घेतल्यानंतर पुणे-नागपूर पाठोपाठ नशिकमध्ये मेट्रो धावेल, असं आश्वासन मुख्यमंत्रीनी दिलं होतं. त्या दृष्टीने व्यवहार्यता तपासणी पूर्ण झाली. डीपीआर बनवण्याचं काम सुरु आहे. 31.40 किलोमीटरच्या पहिल्या टप्पात मेट्रो धावणार आहे. परंतु ही मेट्रो रेल्वे नसून टायर बेस मेट्रो म्हणजेच आर्टिक्युलेटेड बस असेल. बॅटरीवर चालणाऱ्या दोन बस एकमेकांना जोडलेल्या असतील. रॅपिड ट्रान्झिट सिस्टम प्रणालीद्वारे ही सेवा कार्यरत होणार आहे. सुरुवातीला दोन मार्गांवर मेट्रो धावणार आहे. ‘दिल्ली मेट्रो आणि बसमध्ये महिलांना मोफत प्रवास’, दिल्ली विधानसभेच्या तोंडावर अरविंद केजरीवालांचा निर्णय कोणत्या मार्गावर मेट्रो धावणार? सातपूरमधील श्रमिकनगर ते खडकाली सिग्नल, सारडा सर्कल, द्वारका चौक ते नाशिकरोड असा एक मार्ग राहणार आहे. सातपूर रोडवरील अमृत गार्डन चौकात या मार्गावरील मुख्य जंक्शन असणार आहे. तर दुसरा मार्ग मुंबईनाका, सीबीएस अशोक स्तंभ ते गंगापूर गाव असा असणार आहे. मुंबईनाकावर दुसरे जंक्शन असणार आहे. या दोन्ही मार्गांना जोडणारा लूप बरदान फाटा ते श्रमिकनगर या दरम्यान असणार आहे. दोन्ही मार्ग मिळून 29 थांबे असणार आहेत. PHPDT अर्थात ‘पॅसेंजर अवर पर डायरेक्शन ट्रान्सपोर्ट’ या तत्वानुसार या दोन्ही मार्गांची निवड करण्यात आली आहे. दोन्ही मार्गांवर PHPDT आठ हजार आहे. हे प्रमाण साधारणपणे 20 हजार असतं, तर मेट्रो रेल्वे सुरु करता आली असती. मात्र सध्या टायर बेस मेट्रोवरच नाशिककरांना समाधान मानावं लागणार आहे. या दोन्ही मार्गांव्यतिरिक्त  24 फिडर रुटचा अवलंब केला जाणार आहे. त्यात रविवार कारंजा, पंचवटी कारंजा अशा जुन्या नाशिकमधून पुढे नांदूर नाकाकडे बसेस धावू शकतील. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या माध्यमातून मेट्रोची मुहूर्तमेढ रोवली जात आहे. विरोधकांनी मात्र आतापासूनच टीका करायला सुरुवात केली आहे. नाशिककरांना मेट्रो रेल्वेचं स्वप्न दाखवण्यात आलं होतं. प्रत्यक्षात मात्र बस धावणार असल्यानं भाजप सरकार नाशिककरांची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला जात आहे. नाशिक महापालिकेच्या माध्यमातून बससेवा सुरु केली जाणार आहे. त्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मनपा परिवहन सेवेसाठी 400 बसेस खरेदी केल्या जाणर आहेत. त्यातूनच मेट्रोसाठी एसी बस वापरल्या जातील, अशी शक्यता व्यक्त होत आहे. नाशिक महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. शहरात तीन आमदार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक शहर दत्तक घेतल्याचं वक्तव्य केल्यानंतर सुरुवातीपासूनच भाजपला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न केले जाता आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात त्याचा ट्रेलर बघायला मिळाल्याने विधानसभा निवडणुकीला सामोरं जाताना भाजपला विकासकामे दाखवण्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठीच हा खटाटोप सुरु असल्याची शहरात चर्चा आहे. कारण काही असो नाशिकचा विकास होणं महत्त्वाचं.

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis on Nashik potholes: 'असं रिलॅक्स राहून चालणार नाही, महाकुंभ तोंडावर'; नाशिकमधील खड्ड्यांवरुन देवेंद्र फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं
'असं रिलॅक्स राहून चालणार नाही, महाकुंभ तोंडावर'; नाशिकमधील खड्ड्यांवरुन देवेंद्र फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
Prashant Kishor and Sunil Tatkare: प्रशांत किशोरांनी सुनील तटकरेंबाबत थेट नाराजी व्यक्त करताच जय पवारांनी फक्त एकच प्रश्न विचारला, म्हणाले...
प्रशांत किशोरांनी सुनील तटकरेंबाबत नाराजी व्यक्त करताच जय पवारांनी फक्त एकच प्रश्न विचारला, म्हणाले...
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
Chanakya Niti: तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
Delimitation Bill: सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
Embed widget