मुंबई : भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे मॉर्फ केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत. चित्रा वाघ यांच्यासोबत संजय राठोड यांचा मॉर्फ केलेला फोटो विकृतांनी सोशल मीडियावर टाकला आहे. याप्रकरणी आता चित्रा वाघ पोलिसांत धाव घेतली असून कारवाई करण्याची मागणी केली आहे.


सोशल मीडियावर व्हायरल झालेले हे दोन फोटो व्हायरल झाले आहेत. यामध्ये संजय राठोड आणि चित्रा वाघ यांचा मॉर्फ केलेला फोटो विकृतांकडून व्हायरल केला जातोय. मॉर्फ म्हणजे खोटा फोटो. तर दुसरा फोटो चित्रा वाघ आणि त्यांच्या पतीसोबतचा खरा फोटो आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील मॉर्फ केलेल्या फोटोंवर विश्वास ठेवू नका आणि तसे फोटो व्हायरल केल्यास तो सायबर गुन्हा समजला जातो. व्हायरल झालेले फोटो हे चित्रा वाघ यांनी स्वतः माध्यमांपर्यंत पोहोचवले आहेत. या प्रकरणी चित्रा वाघ यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. या संदर्भात लवकरात लवकर कारवाई करावी आणि समाजमाध्यमांवरील हे फोटो लवकरात लवकर हटवावे. तसेय संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. हा फोटो सर्वच समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहे.


सुधीर मुनगंटीवर म्हणाले, अशा विकृतांवर कडक कारवाई गेली पाहिजे. कोर्टाने देखील याची दखल घेतली आहे. एखादी महिला दुसऱ्या महिलेला न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करत असेल तर हा अवमान आहे.


पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडून काढून घ्यावा आणि हा तपास एखाद्या सक्षम आयपीएस अधिकाऱ्याला सोपवावा, अशी मागणी चित्रा वाघ यांनी राज्याच्या पोलीस महासचालकांकडे केली आहे. आमच्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे पुणे पोलिसांनी दिलेले नाहीत. सगळे पुरावे असतानाही पोलीस आणि सरकार कुणाचा वाट पाहते आहे, असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.


संबंधित बातम्या :