वाशिम : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी राज्याच्या वनमंत्री संजय राठोड याचं नाव आल्या नंतर वनमंत्री तब्बल 15 दिवस गायब होते. मात्र ते वाशीम पोहरादेवी येथे २३ फेब्रुवारीला हजारोंच्या संख्येने समर्थकांना घेऊन पोहरादेवी येथे पोहोचले. त्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त देखील दाखल करण्यात आला होता. पाच पन्नास नाही तर 275 पोलीस अधिकारी कर्मचारी यांना बंदोबस्ताकरता पाचारण करण्यात आले होते. मात्र पोहरादेवीतील मुख्य रस्ते सोडून समर्थक पाऊल वाटा आणि शेतीतून मार्गक्रमन करत पोहरादेवी येथ पोहचले.
संजय राठोड यांचे समर्थक हजार पाचशे नाही तर तब्बल 25 हजारांपेक्षा अधिक समर्थक संजय राठोड यांच्या पाठीमागे होते. समर्थकांना ना कोरोनाची भीती ना पोलिसांची भीती. कोरोनाच्या काळात खबरदारी म्हणून जी जबाबदारी पोलिसांना दिली ती पोलिसांनी चोख पार पाडली. मात्र इतक्या मोठ्या संख्येने समर्थकांपुढे 275 पोलीस काय करणार हा मोठा प्रश्न होता. गर्दी पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला मात्र एवढ होऊन ही या सगळ्या गोष्टीला जबाबदार धरल ते वाशीम पोलीस चमूला. राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या कार्यालयांनी थेट वाशीम पोलीस प्रशासनाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. मात्र ज्यांच्यामुळे गर्दी झाली त्यांना मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचे गृह राज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी संजय राठोड यांना क्लीन चीट दिली.
वनमंत्री संजय राठोड यांच्या समर्थनार्थ हजारोंच्या संख्येने लोक पोहरादेवी येथे जमले होते. त्यावेळी ज्या गोष्टीची भीती वर्तवली जात होती ती खरी ठरली आहे. पोहरादेवी जगदंबा देवीचे महंत कबिरदास महाराज यांच्यासह एकूण 19 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कबिरदास महाराज यांच्या कुटुंबातील तिघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. काही जणांना कोरोनाची लक्षणं असल्याचीही माहिती समोर येत आहे.
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी विविध आरोप होत असलेले वनमंत्री संजय राठोड यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव वाढला आहे. संजय राठोड यांच्यामुळे महाविकास आघाडी सरकारची बदनामी होत आहे. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील नाराज असल्याचं बोललं जात आहे. भाजपने सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेत राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होण्यापूर्वी याबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. संजय राठोड यांच्या मुद्द्यावरून अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधक आक्रमक होणार हे नक्की. संपूर्ण अधिवेशन संजय राठोड यांच्या मुद्दाने गाजण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या :
Sanjay Raut : आपला माणूस असला तरी मुख्यमंत्री कारवाई करतील, पोहरादेवी येथील गर्दीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया
Pooja Chavan Death Case | पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात पुणे लष्कर कोर्टात खटला दाखल
भाजपनंतर संजय राठोडांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर स्वकीयांचा दबाव : सूत्र
[yt]