देश विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... 


1. Monsoon Update: आठवडाभरात मान्सूनचं केरळात आगमन, तर त्यापूर्वी राज्यभरात अवकाळीचा इशारा


Maharashtra Monsoon Update: पुढच्या आठवडाभरात मॉन्सून (Monsoon Update) केरळमध्ये (Kerala) दाखल होणार आहे. तर राज्यातील काही भागांत या आठवड्यात पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज असून काही जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  दरम्यान यावेळी मान्सून सामान्य राहण्याचा अंदाज असून जून ते सप्टेंबर या कालावधीत देशात 96 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर 


2. 9 Years Of Modi Government: मोदी सरकारची 9 वर्ष, भाजप राबवणार जनसंपर्क अभियान; आज देशभरात केंद्रीय मंत्र्यांची पत्रकार परिषद


Modi Government 9 Years: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला (BJP Government) नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. 26 मे 2014 रोजी नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. या प्रवासातील मोदी सरकारचं (Modi Government) यश सांगण्याची जबाबदारी आता केंद्रीय मंत्र्यांवर देण्यात आली आहे. सोमवारी (29 मे) केंद्रीय मंत्री देशभरात एकाच वेळी पत्रकार परिषद घेणार आहेत. या दरम्यान देशातील प्रत्येक राज्याच्या राजधान्यांमध्ये केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत. वाचा सविस्तर 


3. Congress Vs BJP: नव्या संसद भवनाच्या वादानंतर आता काँग्रेस-भाजपमध्ये नेहरु-मोदींवरुन जुंपली; प्रकरण नेमकं काय?


Jawaharlal Nehru Vs Narendra Modi: नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावर (New Parliament Inauguration) बहिष्कार टाकणाऱ्या 20 विरोधी पक्षांपैकी एक असलेल्या काँग्रेसनं (Congress) पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधला आहे. काँग्रेसनं एक फोटो ट्वीट केला आहे, ज्यामध्ये पंतप्रधान मोदींची लहान प्रतिमा आहे, त्याचशेजारी पंडित जवाहरलाल नेहरू (Jawaharlal Nehru) यांची एक उंच प्रतिमा मोदींच्या शेजारी दाखवण्यात आली आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे, पंतप्रधान मोदी पंडीत जवाहरलाल नेहरुंच्या उंचीपर्यंत पोहोचू शकत नाही, हे दाखवण्याचा प्रयत्न काँग्रेसनं केला आहे. काँग्रेसच्या या ट्वीटमुळे काँग्रेस आणि भाजपमध्ये (BJP) नवं वाकयुद्ध युद्ध सुरू झालं आहे. वाचा सविस्तर 


4. Wrestlers Protest : कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी आणि विनेश यांच्या विरोधात FIR; दंगल भडकावण्यासह 'या' कलमांतर्गत गुन्हा दाखल


Delhi Wrestlers Protest : दिल्लीच्या जंतर-मंतरवर (Jantar Mantar) लैगिंक शोषणाविरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना (Wrestlers Protest) पोलिसांनी रविवारी ताब्यात घेतलं. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्याविरोधात गेल्या काही दिवसांपासून महिला कुस्तीपटूंचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात अनेक पुरुष कुस्तीपटूही सहभागी झाले होते. रविवारी आंदोलक महिला कुस्तीपटूंसह पुरुष कुस्तीपटूंना ताब्यात घेऊन त्यानंतर त्यांना सोडण्यात आलं. यासोबतच आंदोलक कुस्तीपटूंवर एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. कुस्तीपटूंवर दंगल भडकावण्यासह इतर कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाचा सविस्तर 


5. Wrestlers Protest: "आमच्यावर FIR दाखल करण्यास केवळ 7 तास अन् बृजभूषण यांच्याविरोधात..."; सुटकेनंतर बजरंग पुनियानं दिल्ली पोलिसांवर साधला निशाणा


Wrestlers Protest News: दिल्लीच्या (Delhi) जंतरमंतरवर (Jantar Mantar) महिला कुस्तीपटुंच्या आंदोलनात (Wrestlers Protest News) सहभागी असलेल्या बजरंग पुनियाला (Bajrang Punia) पोलिसांनी मध्यरात्री सोडलं. बाहेर आल्यानंतर बजरंग पुनियानं दिल्ली पोलिसांवर (Delhi Police) निशाणा साधला आहे. बजरंग पुनिया म्हणाला की, हे या देशाचं दुर्दैव आहे, ज्याच्यावर वारंवार लैंगिक छळाचे आरोप होत आहेत, असा आरोपी संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनाला उपस्थित होता. वाचा सविस्तर 


6. IPL 2023 Final : आज रंगणार आयपीएलचा महामुकाबला, पावसामुळे रविवारचा सामना सोमवारी; चेन्नई की गुजरात कोण ठरणार चॅम्पियन


IPL 2023 Final Match Postponed : इंडियन प्रीमियर लीगच्या यंदाच्या सोळाव्या हंगामाचा महाअंतिम सामना (GT vs CSK) आज, 29 मे रोजी पार पडणार आहे. रविवारी अंतिम सामना पावसामुळे रद्द झाल्याने हा सामना आज सोमवारी राखीव दिवशी खेळवण्यात येणार आहे. अहमदाबादमधील पावसाने रविवारी प्रेक्षकांचा हिरमोड केला. अहमदाबादच्या पावसाचा आयपीएल फायनलला तडाखा बसलाय. फायनल सुरु होण्यासाठी रात्री उशिरापर्यंत प्रतीक्षा करावी लागली. पण, पावसाची उघडझाप कायम राहिल्याने रविवारी सामना होऊ शकला नाही. परिणामी आज आयपीएल 2023 चा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. वाचा सविस्तर 


7. 29th May In History: जागतिक हृदय दिन, विनोदी अभिनेते मेहमूद यांचा जन्म, चौधरी चरण सिंह यांचे निधन; आज इतिहासात


29th May In History: इतिहासात प्रत्येक दिवसाचे महत्त्व असते. आजच्या दिवशी विनोदी अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते मेहमूद यांचा जन्म झाला होता, तर 2022 त्या गर्भपात कायद्यानुसार सर्व महिलांना 24व्या आठवड्यापर्यंत गर्भपाताला परवानगी देण्यात आली होती. 29 मे हा दिवस जागतिक हृदय दिन म्हणून देखील साजरा होतो. जाणून घ्या आजच्या दिवशी इतिहासात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी... वाचा सविस्तर 


8. Horoscope Today 29 May 2023 : आज 'या' राशींना मिळणार नशिबाची साथ! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य


Horoscope Today 29 May 2023 : आज सोमवार हा महत्त्वाचा दिवस आहे. आज मेष राशीच्या लोकांना व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. तर, वृषभ राशीच्या लोकांना कुटुंबाची साथ मिळेल. धनु राशीच्या लोकांना नवीन नोकरीची ऑफर देखील मिळेल. कसा राहील मेष ते मीन राशीसाठी आजचा सोमवार? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. वाचा सविस्तर