Jawaharlal Nehru Vs Narendra Modi: नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावर (New Parliament Inauguration) बहिष्कार टाकणाऱ्या 20 विरोधी पक्षांपैकी एक असलेल्या काँग्रेसनं (Congress) पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधला आहे. काँग्रेसनं एक फोटो ट्वीट केला आहे, ज्यामध्ये पंतप्रधान मोदींची लहान प्रतिमा आहे, त्याचशेजारी पंडित जवाहरलाल नेहरू (Jawaharlal Nehru) यांची एक उंच प्रतिमा मोदींच्या शेजारी दाखवण्यात आली आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे, पंतप्रधान मोदी पंडीत जवाहरलाल नेहरुंच्या उंचीपर्यंत पोहोचू शकत नाही, हे दाखवण्याचा प्रयत्न काँग्रेसनं केला आहे. काँग्रेसच्या या ट्वीटमुळे काँग्रेस आणि भाजपमध्ये (BJP) नवं वाकयुद्ध युद्ध सुरू झालं आहे.


काँग्रेसच्या या ट्वीटला उत्तर देताना भाजपनंही एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये जवाहरलाल नेहरूंचा कॅमेऱ्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. तसेच, कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'नेहरूंचं सत्य'. फोटोमध्ये जवाहरलाल नेहरु एका कॅमेऱ्यासमोर उभे असून त्या कॅमेऱ्याचा फोकस पूर्णपणे नेहरुंवर दिसत आहे, तसेच फोटोवर 'रील, रियल' असे शब्दही लिहिलेले आहेत.






नवीन संसद भवनावरुन गदारोळ


नव्या संसद भवनाच्या उद्घाटन समारंभावर बहिष्कार टाकताना अनेक विरोधी पक्षांनी हा लोकशाहीचा घोर अपमान असल्याचं म्हटलं आहे. नव्या संसद भवनाच्या इमारत उद्घाटन समारंभावर बहिष्कार टाकणाऱ्या विरोधी पक्षांच्या संयुक्त निवेदनात म्हटलं आहे की, "नवीन संसद भवन भारतातील लोकांशी किंवा ज्यांच्यासाठी ते बांधण्यात आलं आहे, त्यांचा कोणताही सल्ला न घेता बांधण्यात आलं आहे. लोकशाहीचा आत्मा संसदेतून बाहेर काढला जात असताना, नव्या इमारतीपेक्षा जुनीच इमारत आम्हाला प्रिय आहे. आम्ही संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनावर बहिष्कार टाकण्याचा आमचा सामूहिक निर्णय जाहीर करतो." 






काही लोक राजवटीत बसले की, देश पुढे जात नाही : प्रियांका गांधी 


नव्या संसद भवनाच्या एक दिवस अगोदर (27 मे) काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधत ट्वीट केलं होतं. ट्वीटमध्ये त्या म्हणाल्या की, "काही लोक सत्तेवर बसले की, देश पुढे जात नाही, देश तेव्हाच पुढे जातो, ज्यावेळी देशातील कोट्यवधी लोक खुश असतात आणि प्रगती करतात. आम्ही असंच स्वप्न पाहिलं आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन."


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


New Parliament Building: 'राज्याभिषेक पूर्ण झाला, आता अहंकारी राजा जनतेचा आवाज दाबतोय; राहुल गांधींचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा