देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...


'इंडिया' हे नाव गुलामगिरीचं प्रतीक, ते घटनेतून वगळलं पाहिजे; भाजप खासदाराची राज्यसभेत मागणी


New Delhi: आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) भाजपला (BJP) सत्तेपासून दूर करण्यासाठी विरोधी पक्षांनी एकजूट केली आहे. सर्व भाजप विरोधी पक्ष एकत्र आले असून 26 विरोधी पक्षांच्या युतीला I.N.D.I.A. (इंडियन नॅशनल डिवेलपमेंटल  इन्क्लुझिव्ह अलायंस) असं नाव देण्यात आलं आहे. यावरुनच भाजपनं विरोधकांच्या एकजुटीवर निशाणा साधला आहे. या सर्व राजकीय उलथापालथी दरम्यान, आता मात्र भाजपच्या एका खासदारानं केलेल्या मागणीमुळं राजकीय नाट्याचा नवा अंक रंगण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाच्या (BJP) एका राज्यसभा खासदारानं गुरुवारी देशाच्या संविधानातून 'इंडिया' हा शब्द हटवण्याची मागणी केली आहे. वाचा सविस्तर


Weather Update Today : दिल्ली-एनसीआरमध्ये पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा, तर हिमाचलमध्ये पुराचा धोका; वाचा हवामान विभागाचा अंदाज


Weather Update Today : देशभरात पावसाची (Rain) संततधार सुरूच आहे. राजधानी दिल्ली-एनसीआरमध्ये शुक्रवारपासून सुरू असलेल्या पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले आहे. अशातच आणखी दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. वाचा सविस्तर 


Semicon India 2023 : AMD बंगळुरूमध्ये 5 वर्षांत 400 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक करणार, 3 हजार रोजगारांना मिळणार संधी


Semicon India 2023 : AMD, Micron, Cadence, Lam आणि इतर उद्योगक्षेत्रातील अनेक मान्यवरांनी गुजरातमध्ये आयोजित करण्यात आलेल्या  वार्षिक सेमीकंडक्टर परिषदेत उपस्थिती लावली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे देखील उपस्थित होते. वाचा सविस्तर  


ITR Filing 2023: आतापर्यंत 5 कोटी ITR दाखल, करदात्यांना इनकम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी फक्त 72 तास शिल्लक


Income Tax Return: तुम्ही अद्याप 2023-24 आर्थिक वर्षासाठी टॅक्स (Income Tax) रिटर्न भरले नसेल, तर अजिबात वेळ वाया न घालवता लगेच ITR भरा. आयटीआर फाईल करण्यासाठी करदात्यांकडे आता फक्त तीन दिवस म्हणजेच, 72 तास शिल्लक आहेत. अशातच आतापर्यंत पाच कोटी करदात्यांनी टॅक्स रिटर्न फाईल केलं आहे, स्वतः आयकर विभागानं ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. वाचा सविस्तर


Death Penalty : सिंगापूरमध्ये 20 वर्षांत पहिल्यांदाच महिलेला फाशी; वाचा फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या सारीदेवीचा गुन्हा


Drug Trafficking : सिंगापूरमध्ये (Singapore) शुक्रवारी एका 45 वर्षीय महिलेला (Woman) अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी (Drug trafficking) फाशी देण्यात आली. फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या महिलेचं नाव सरीदेवी बिंते जमानी (Saridewi Djamani) असं होतं. 2018 मध्ये सरीदेवी ड्रग हेरॉइनची तस्करी केल्याप्रकरणी दोषी आढळली होती. मात्र, सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सिंगापूरमध्ये तब्बल वीस वर्षांनंतर एका महिलेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. वाचा सविस्तर 


Muharram 2023 : मोहर्रम महिन्यात मुस्लिम बांधव का व्यक्त करतात शोक? काय आहे मोहर्रमचा इतिहास


Muharram 2023 : मोहर्रम' हा इस्लामिक कालगणनेतील पहिला महिना आहे. या महिन्याने इस्लामच्या नव्या वर्षाची सुरुवात होते. मोहर्रम महिन्यात हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू हुसेन हे करबला येथे शहीद झाले होते. हजरत इमाम हुसेन यांच्या हौतात्म्याच्या स्मरणार्थ, लोक मोहर्रमच्या 10 व्या दिवशी शोक व्यक्त करतात. मोहर्रमच्या दहाव्या दिवसाला आशुरा असे म्हणतात. वाचा सविस्तर 


29th July In History: भारताने हॉकीमधील शेवटचं ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकलं, श्रीलंकेत शांततेसाठी राजीव गांधी-जयवर्धने करार; आज इतिहासात


29th July In History: 29 जुलैचा इतिहास भारतीय हॉकीच्या सुवर्णकाळाची आठवण करून देतो. एकेकाळी आशियातील पारंपरिक हॉकी संघ युरोपियन संघांसमोर नांगी टाकत असत तर दुसरीकडे भारतीय हॉकी संघाने 1928 ते 1956 दरम्यान ऑलिम्पिक खेळांमध्ये सलग सहा सुवर्णपदके जिंकली. वाचा सविस्तर


Horoscope Today 29 July 2023 : आज 'या' राशींवर असेल शनिदेवाची कृपा! कसा आहे आजचा शनिवार? राशीभविष्य जाणून घ्या


Horoscope Today 29 July 2023 : आज शनिवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार मेष राशीच्या लोकांनी आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. तर, कन्या राशीच्या लोकांनी आज प्रवास टाळावा. एकूणच मेष ते मीन राशीसाठी आजचा शनिवार कसा असेल? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. वाचा सविस्तर