देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...


GST Council Meeting:  जीएसटी कौन्सिलची आज बैठक; कॅन्सरची औषधे, थिएटरमधील खाद्यपदार्थ स्वस्त होणार?


GST Council Meeting:  आज जीएसटी परिषदेची (GST Council) महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन  ( Nirmala Sitharaman) यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषदेची ही 50 वी बैठक असणार आहे. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. या बैठकीत कॅन्सरवरील औषध स्वस्त करण्याचा आणि सिनेमागृहात खाण्यापिण्याचे पदार्थ स्वस्त करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. वाचा सविस्तर 


Article 370 : जम्मू काश्मीरमधून कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज सुनावणी, केंद्राने प्रतिज्ञापत्रात काय म्हटलंय?


Supreme Court Hearing On Article 370 : जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 (Article 370) रद्द करण्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज (11 जुलै) सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी होणार आहे. केंद्र सरकारने 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवलं होतं.  त्यानंतर जम्मू काश्मीर आणि लडाख अशी दोन केंद्रशासित राज्ये बनवण्यात आली होती. वाचा सविस्तर


Weather Update : उत्तर भारतात पावसाचा हाहाकार, जनजीवन विस्कळीत; आत्तापर्यंत 37 जणांचा मृत्यू


Weather Update : उत्तर भारतात पावसानं (North India Rain) थैमान घातलं आहे. यामुळं अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. पावसामुळं आत्तापर्यंत उत्तर भारतात 37 जणांचा मृत्यू झाला आहे. मदत आणि बचाव कार्याला गती देण्यासाठी लष्कर आणि एनडीआरएफच्या अनेक तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांशी परिस्थितीची माहिती घेतली आहे. केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत आणि सहकार्य करण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिले आहे. वाचा सविस्तर 


2006 Mumbai train bombings : मुंबईच्या लाईफलाईनचा सर्वात वाईट दिवस! 11 जुलै 2006 रोजी सात ठिकाणी बॉम्बस्फोट आणि मायानगरी हादरली


2006 Mumbai Local Bomb Blast :  रोज लाखो प्रवाशांसाठी लाईफलाईन असलेली मुंबई लोकल 16 वर्षांपूर्वी, 11 जुलै 2006 रोजी हादरून गेली होती. सकाळी आणि संध्याकाळची वेळ ही मुंबई लोकलच्या वर्दळीची. अनेक प्रवासी त्या दिवशी याच वर्दळीतून प्रवास करत होते आणि कदाचित त्यांचा तो शेवटचा प्रवास असेल याची काही जणांनी कल्पना देखील नव्हती. पश्चिम रेल्वेच्या मुंबई लोकलच्या (Mumbai Local) स्थानकांवर एक मागून एक सात स्फोट झाले आणि मायानगरी हादरुन गेली. वाचा सविस्तर


Akhilesh Yadav Mumbai Visit : अखिलेश यादव मुंबईत आले, पण शरद पवारांची भेट न घेताच परतले; का?


Akhilesh Yadav Mumbai Visit : समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव (Akhilesh Yadav) सोमवारी मुंबई दौऱ्यावर आलेले. आपल्या या मुंबई दौऱ्यादरम्यान अखिलेश यादव मुंबईत विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या भेटी घेणार असल्याचं बोललं जात होतं. परंतु, त्यांनी कोणत्याही विरोधी पक्षाच्या नेत्याची भेट घेतली नाही. यावर अखिलेश यादव यांचा हा खाजगी दौरा होता, हा कोणाताही राजकीय दौरा नव्हता. त्यामुळे त्यांनी कोणत्याही राजकीय भेटी-गाठी घेतल्या नसल्याचं समाजवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यानं सांगितलं. तसेच, अखिलेश यादव यांनीही याच मुद्द्यावरुन माध्यमांवर नाराजी व्यक्त केली. वाचा सविस्तर 


Amit Shah : कृषी पतसंस्थांच्या बळकटीकरणासाठी दिल्लीत महापरिषद, सहकारमंत्री अमित शाह यांच्या हस्ते होणार उद्घाटन


Amit Shah : 'शेतकरी उत्पादक संघटनांच्या माध्यमातून प्राथमिक कृषी पतसंस्थांचे बळकटीकरण' या विषयावर आधारित एक दिवसीय महापरिषद दिल्लीत होणार आहे. येत्या 14 जुलैला ही परिषद होणार असून केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह (Minister Amit Shah) यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन होणाराय. प्राथमिक कृषी पतसंस्थांचे (पीएसीएस) बळकटीकरण करण्याच्या मुद्यावर या महापरिषदेत चर्चा होणार आहे. वाचा सविस्तर 


Horoscope Today :  मेष, वृषभ, सिंह आणि मीन राशींच्या लोकांना होणार आर्थिक फायदा, वाचा आजचं राशीभविष्य


Horoscope Today 11 July 2023 : आज वार मंगळवार दिनांक 11 जुलै 2023. आजचा दिवस काही राशींच्या लोकांसाठी खास असणार आहे. मेष , वृषभ, सिंह आणि मीन राशींच्या लोकांना आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. पाहुयात आजचा दिवस मेष ते मीन या राशींच्या लोकांसाठी कसा राहील. वाचा सविस्तर