देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...


PM Modi in Chandrapur : वाघाच्या भूमीत घुमणार पंतप्रधान मोदींचा आवाज, चंद्रपुरात 16 एकरावर विराट सभा;सुधीर मुनगंटीवारांच्या प्रचाराचा आज फुटणार नारळ!


चंद्रपूर :  पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi In Maharashtra)  यांची महाराष्ट्रातील पहिली सभा आज चंद्रपुरात (Chandrapur) होत आहे. भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवारांच्या (Sudhir Mungantiwar)  प्रचारासाठी तब्बल 10 वर्षांनी मोदी चंद्रपुरात (Modi in Chandrapur)  येणार आहेत. दुपारी साडेचारच्या सुमारास मोदी चंद्रपुरात येतील. त्यानंतर त्यांची सभा होईल. विशेष म्हणजे चंद्रपुरात तब्बल दहा वर्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Lok Sabha Election) यांची सभा होणार आहे. या सभेला मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि इतर नेते उपस्थित राहतील.  दरम्यान चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांच्यात थेट लढत होणार आहे. वाचा सविस्तर...


Rain Update : अवकाळी पावसाचं संकट कायम! मराठवाड्याला येलो तर, विदर्भाला ऑरेंज अलर्ट; IMD चा अंदाज काय सांगतो?


Weather Update Today : मुंबईसह राज्यभरातील शहरांच्या कमाल तापमानात वाढ नोंदविण्यात येत असतानाच राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाचं संकट (Unseasonal Rain) कायम आहे. राज्यात 8 ते 10 एप्रिलदरम्यान तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस आणि वादळी पावसाची शक्यता आहे. तर विदर्भात काही ठिकाणी गारपीट होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. राज्यात पुढील 24 तासात काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे, तर काही ठिकाणी तापमानात वाढ होणार असून पारा 40 अंशांवरच राहण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर...


Amol Kirtikar : ठाकरे गटाचा आणखी एक नेता ईडीच्या फेऱ्यात, अमोल कीर्तीकर यांना चौकशीसाठी समन्स


मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray Group) उमेदवार अमोल कीर्तीकर (Amol Kirtikar) ईडी (ED) चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. अमोल किर्तीकर यांना ईडीकडून चौकशीसाठी समन्स देण्यात आलं असून आज ते ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार आहेत. ईडी कार्यालयाने कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी (BMC Covid Scam) चौकशीसाठी अमोल कीर्तीकर यांना हजर राहण्याचे समन्स पाठवण्यात आलं आहे. अमोल कीर्तीकर यांना ठाकरे गटाने लोकसभेचं तिकीट दिलं आहे, त्यातच उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच त्यांना ईडीने समन्स दिलं होतं. आता निवडणुकीआधी त्यांची ईडी चौकशी होणार आहे. वाचा सविस्तर...


CM Eknath Shinde : शिवसेनेसाठी 100 हून अधिक केसेस छातीवर घेतल्याने मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचलो; शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल


नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा शिंदेसेना विरुद्ध ठाकरे सेना आमने सामने पाहायला मिळत आहे. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आपल्या प्रत्येक भाषणातून एकमेकांवर टीकेचे बाण सोडतांना पाहायला मिळत आहे. दरम्यान, रविवारी रामटेक लोकसभा मतदारसंघातील (Ramtek Lok Sabha Constituency) शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलतांना मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. "शिवसेनेसाठी 100 हून अधिक केसेस छातीवर घेतल्याने मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचलो" असल्याचे म्हणत शिंदेंनी ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. वाचा सविस्तर...


Indian Railways : उन्हाळी सुट्टी गावी जाणाऱ्यांसाठी खुशखबर ! 28 अतिरिक्त विशेष ट्रेन; येथे करा आरक्षण


मुंबई : उन्हाळी सुट्ट्यामध्ये (Summer Holidays)  प्रवाशांचा वाढता ओघ लक्षात घेता मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेकडून मुंबई - मऊ / कोच्चुवेली दरम्यान 28 अतिरिक्त उन्हाळी विशेष ट्रेन सेवा (Summer Special Train) चालवण्यात येणार आहेत. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने अतिरिक्त उन्हाळी विशेष रेल्वे सेवा चालवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. वाचा सविस्तर...


मोठी बातमी : महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा सुटला, संयुक्त पत्रकार परिषदेतून उमेदवारांची घोषणा होणार


मुंबई : महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा (Maha Vikas Aghadi Seat Shearing) तिढा सुटला असून, लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) महाविकास आघाडीकडून कोणता पक्ष कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे याचा अंतिम निर्णय झाला आहे. विशेष म्हणजे उद्याच याची घोषणा होणार आहे. शरद पवार (Sharad Pawar), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व नाना पटोले (Nana Patole) यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून महाविकास आघाडीचा जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला जाहीर केला जाणार आहे. यासाठी उद्या सकाळी 11 वाजता तिन्ही पक्षाची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. वाचा सविस्तर...


मुंबई-लखनौच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा फेरबदल, दिल्ली तळाला, चेन्नईचीही घसरण!


IPL 2024 Points Table : आयपीएल 2024 मध्ये रविवारी ( 7 एप्रिल) दोन सामने झाले. मुंबई-दिल्ली (MI vs DC) आणि लखनौ-गुजरात (LSG vs GT) यांच्यामध्ये रंगतदार लढती झाल्या. मुंबई इंडियन्सने पहिल्या विजयाची नोंद केली, तर लखनौने आपला तिसरा विजय नोंदवला. दुसरीकडे दिल्ली कॅपिट्ल्सचा चौथा पराभव पाहावा लागला. लखनौच्या विजयाचा फटका चेन्नईला बसला. ऋतुराज गायकवाडचा चेन्नई संघ चौथ्या क्रमांकावर पोहचला आहे.  तर दिल्ली आणि आरसीबीचे संघ तळाला पोहचले आहेत. वाचा सविस्तर...


Horoscope Today 8 April 2024 : आज 'या' राशींना मिळणार नशिबाची उत्तम साथ, नोकरी-व्यवसायातही प्रगतीची संधी; वाचा सोमवारचे राशीभविष्य


Horoscope Today 8 April 2024 : पंचांगानुसार, आज 8 एप्रिल 2024, आठवड्यातला पहिला दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता काही राशीच्या लोकांच्या जीवनात आज अडथळा येऊ शकतो, तर काहींचं जीवन सहज सोपं असेल. सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा सोमवार कसा राहील? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) वाचा सविस्तर...