Horoscope Today 8 April 2024 : पंचांगानुसार, आज 8 एप्रिल 2024, आठवड्यातला पहिला दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता काही राशीच्या लोकांच्या जीवनात आज अडथळा येऊ शकतो, तर काहींचं जीवन सहज सोपं असेल. सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा सोमवार कसा राहील? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या


मेष (Aries Horoscope Today)


विवाह उत्सुक तरुण-तरुणींचे विवाह जमतील. ज्येष्ठांनी आपली तब्येत सांभाळावी. अपचनाचे विकार टाळण्यासाठी खाण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. महिलांनी पथ्य पाणी सांभाळावे.


वृषभ (Taurus Horoscope Today)


परदेशागमनाच्या संधी मिळतील. विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. डोकं शांत ठेवलं तर घरात सर्वांचा मूड सांभाळला जाईल. महिलांना आर्थिक फायदा संभवतो.


मिथुन (Gemini Horoscope Today)


विलक्षण धडाडी आणि त्याबरोबर येणाऱ्या अविचारी साहसी वृत्तीला आज थोडं खत पाणीच मिळणार आहे. तुमच्या हत्ती आणि जिद्दी स्वभावाचे दर्शन लोकांना घडेल. महिला हुकूमत गाजवतील.


कर्क (Cancer Horoscope Today)


नवीन संधी चालून येतील. आरोग्य चांगले राहील. मनमोकळ्या स्वभावाने सर्वांना आपलेसे करून टाकाल. महिलांनी संशयी स्वभाव सोडावा.


सिंह (Leo Horoscope Today)


नोकरी धंद्यात वरिष्ठांची मर्जी राखण्यासाठी जरा वेगळी पद्धत वापरावी लागेल. जरुरी पेक्षा जरा जास्त आत्मविश्वास दाखवाल. महिला कोणतेही काम धडाडीने आणि नावीन्यपूर्ण करण्यासाठी जीवाचा आटापिटा करतील.


कन्या (Virgo Horoscope Today)


अति भावनाप्रधान होण्याचा आज योग आहे. त्यामुळे शिल्लक गोष्टीने ही नर्व्हस व्हाल. दुसऱ्याला मदत करण्याची वृत्ती थोडी बळावेल. महिलांना प्रतिष्ठा मिळेल.


तुळ (Libra Horoscope Today)


प्रसिद्धी मिळवून देणारे योग चालून येतील. अशावेळी मोठी सामाजिक व राजकीय कार्य हातून घडे ल. मोठ्या भावंडाच्या दृष्टीने चांगल्या घटना घडतील.


वृश्चिक (Scorpio Horoscope Today)


नको त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून मार्ग आखाल. आर्थिक स्थिती सुधारेल. सर्वांची काळजी घ्याल. दूरदृष्टीमुळे फायदा होईल. महिला आव्हाने पेलतील.


धनु (Sagittarius Horoscope Today)


संघर्ष करावा लागला तरी यश मिळेल. नोकरी व्यवसाय बाबत हा अनुभव घ्याल. तुमच्या आमच्या गुणांची कार्यशक्तीची थोडी कुटुंबना झाली तरी फारसे मनावर घेऊ नका. महिला साधक बाधक विचार करतील.


मकर (Capricorn Horoscope Today)


तुमच्या करड्या आणि कणखर स्वभावामुळे दुसऱ्याच्या मनात आदर युक्त भीती निर्माण करण्यात तुम्ही यशस्वी होणार आहात. कलाकार लोकांना ग्रहमान चांगले आहे. महिलांची कल्पनाशक्ती वाढेल.


कुंभ (Aquarius Horoscope Today)


आजचा दिवस स्फूर्ती देणार आहे. तुमच्या प्रत्येक कृती मागे व्यावहारिक बैठक असेल. तुमची भूमिका शुद्ध आणि सरळ असल्यामुळे बिनधास्तपणे येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाल.


मीन (Pisces Horoscope Today)


स्वतःच्या सुखाबरोबर इतरांच्या सुखाचा ही विचार कराल. कामामध्ये कित्येकदा थोडा विचार किंवा घाई सुद्धा होऊ शकते. महिलांना हाती घेतलेल्या कामात अडचणी येतील.


डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)


संपर्क - 9823322117


हे ही वाचा :


Solar Eclipse 2024 : 8 एप्रिलला लागणार वर्षातील पहिलं सूर्यग्रहण; ग्रहणाचा पृथ्वीवर 'असा' होईल प्रभाव