एक्स्प्लोर

शताब्दी सोहळ्यादरम्यान साईबाबांच्या झोळीत कोट्यवधींचं दान

उत्सव काळात आलेल्या साई भक्तांकडून चार दिवसात साईंच्या झोळीत तब्बल 5 कोटी 97 लाखांचं विक्रमी दान प्राप्त झालं आहे.

शिर्डी : शिर्डीत पार पडलेल्या शताब्दी समाधीच्या पुण्यतिथी उत्सवादरम्यान आलेल्या साईभक्तांनी बाबांना भरभरुन दान दिलं आहे. उत्सव काळात आलेल्या साई भक्तांकडून चार दिवसात साईंच्या झोळीत तब्बल 5 कोटी 97 लाखांच विक्रमी दान प्राप्त झालं आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सव्वा कोटीनं जास्त दान प्राप्त झालं आहे.

विजयादशमीच्या दिवशी दरवर्षी साईबाबांचा पुण्यतीथी उत्सव साजरा करण्यात येतो. तीन दिवस हा उत्सव साजरा करण्यात येतो. यावर्षी समाधी शताब्दी वर्ष असल्यानं तीन लाखाहून अधिक भाविकांनी साईंच्या समाधीचं दर्शन घेतलं. 16 ते 19 ऑक्टोबरदरम्यान लाखो भाविकांनी शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेतलं.

या चार दिवसात आलेल्या दानाची आज मोजदाद करण्यात आली आहे. त्यानुसार भाविकांनी दानपेटीत 2 कोटी 52 लाख रुपये, ऑनलाईन पद्धतीने 1 कोटी 41 लाख रुपये, देणगी काऊंटरवर 1 कोटी 46 लाख रूपये दान दिलं. तर दानपेटीत सुमारे 28 लाखांचे सोने आणि चांदीही भाविकांनी अर्पण केली. याशिवाय भिक्षा झोळीत साडेतीन लाख रुपये, 21 देशांचे 25 लाख रुपयांचे परकीय चलनही दानपेटीत मिळाले आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत दानात 1 कोटी 26 लाख रुपयांची वाढ झाली, तर एकूण 5 कोटी 97 लाख रुपयांचे विक्रमी दान जमा झाल्याची माहिती संस्थानच्या वतीनं देण्यात आली.

या दानाव्यतिरिक्त साईभक्तांना दिल्या जाणाऱ्या व्हीआयपी पेड दर्शनाच्या माध्यमातूनही 78 लाख रूपये तर लाडू विक्रीतून 28 लाख रूपये साई संस्थानला मिळाले आहेत. यावर्षी साई समाधीला शंभर वर्ष पूर्ण झाल्यानं विशेष महत्व होतं. शताब्दी समाधी वर्षात देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती वेंकैया नायडू, पंतप्रधान नरेंद मोदी, महाराष्ट्राचे राज्यपाल के. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह अनेक दिग्गजांनी साई दरबारी हजेरी लावत साईंचे दर्शन घेतलं.

महत्त्वाच्या बातम्या

NEET Results: 'नीट'चा पुन्हा बोजवारा; ज्ञानेश्वरीला अँसर कीनुसार 700 प्लस, पण प्रत्यक्षात फक्त 87 गुण, आईचा आक्रोश, विद्यार्थीला रडू
'नीट'चा पुन्हा बोजवारा; ज्ञानेश्वरीला अँसर कीनुसार 700 प्लस, पण प्रत्यक्षात फक्त 87 गुण, आईचा आक्रोश, विद्यार्थीला रडू
Sonam Wangchuk: गोकुळ कर्मचारी संघटनेचा सोनम वांगचुक यांना पाठिंबा; आंदोलन का केलं? जय श्रीरामच्या घोषणा देत भाजप कार्यकर्त्यांचा गोकुळ कार्यालयात गोंधळ
गोकुळ कर्मचारी संघटनेचा सोनम वांगचुक यांना पाठिंबा; आंदोलन का केलं? जय श्रीरामच्या घोषणा देत भाजप कार्यकर्त्यांचा गोकुळ कार्यालयात गोंधळ
Maharashtra Breaking LIVE: अभिजीत दीपकेंवर शाईफेक, आंदोलनस्थळी गोंधळ 
Maharashtra Breaking LIVE: अभिजीत दीपकेंवर शाईफेक, आंदोलनस्थळी गोंधळ 
Sonam Wangchuk Wife Gitanjali Angmo: अशाने विश्वगुरु होणार का? 20 दिवस उपोषणावर असलेल्या सोनम वांगचुक यांना फरफटत नेताच पत्नीच्या संतापाचा उद्रेक
अशाने विश्वगुरु होणार का? 20 दिवस उपोषणावर असलेल्या सोनम वांगचुक यांना फरफटत नेताच पत्नीच्या संतापाचा उद्रेक

व्हिडीओ

Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकशाहीसाठी खूप घातक दिवस, आपण कोणत्या परिस्थितीमध्ये जगतोय? नीटमुळे 20 मुलं-मुलींनी आयुष्य संपवलं, सरकार जबाबदार नाही? सोनम वांगचुकना उचलताच अमित ठाकरेंचा जंतर मंतरवर संताप
लोकशाहीसाठी खूप घातक दिवस, आपण कोणत्या परिस्थितीमध्ये जगतोय? नीटमुळे 20 मुलं-मुलींनी आयुष्य संपवलं, सरकार जबाबदार नाही? सोनम वांगचुकना उचलताच अमित ठाकरेंचा जंतर मंतरवर संताप
NEET Results: 'नीट'चा पुन्हा बोजवारा; ज्ञानेश्वरीला अँसर कीनुसार 700 प्लस, पण प्रत्यक्षात फक्त 87 गुण, आईचा आक्रोश, विद्यार्थीला रडू
'नीट'चा पुन्हा बोजवारा; ज्ञानेश्वरीला अँसर कीनुसार 700 प्लस, पण प्रत्यक्षात फक्त 87 गुण, आईचा आक्रोश, विद्यार्थीला रडू
सोनम वांगचुकांना पाठिंबा देण्यासाठी 'लॉ' कॉलेजची 64 वर्षीय विद्यार्थीनी मुंबईत; आजी म्हणाल्या, व्यवस्थेची मी व्हिक्टीम
सोनम वांगचुकांना पाठिंबा देण्यासाठी 'लॉ' कॉलेजची 64 वर्षीय विद्यार्थीनी मुंबईत; आजी म्हणाल्या, व्यवस्थेची मी व्हिक्टीम
Satara Crime: पुणे बेंगलोर महामार्गावर कराड तालुक्यात मध्यरात्री थरार; अंदाधुंद गोळीबारात एक गंभीर जखमी, पैशाचा वाद की भाईगिरीतू गँगवॉर?
पुणे बेंगलोर महामार्गावर कराड तालुक्यात मध्यरात्री थरार; अंदाधुंद गोळीबारात एक गंभीर जखमी, पैशाचा वाद की भाईगिरीतू गँगवॉर?
'एनडीए'मध्ये येण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीपुढे भाजपची अट; दिल्लीतून स्पष्टच सांगितलं, सूत्रांची माहिती
'एनडीए'मध्ये येण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीपुढे भाजपची अट; दिल्लीतून स्पष्टच सांगितलं, सूत्रांची माहिती
Mumbai Local News: लोकलमधून प्लॅटफॉर्मच्या विरूध्द दिशेला गेला; लोखंडी रॉडवर पाय ठेवला, भरधाव वेगात रेल्वे आली अन्...शॉर्टकटच्या नादात तरुणानं नको तेच केलं; अंगावर काटा आणणारा VIDEO समोर
लोकलमधून प्लॅटफॉर्मच्या विरूध्द दिशेला गेला; लोखंडी रॉडवर पाय ठेवला, भरधाव वेगात रेल्वे आली अन्...शॉर्टकटच्या नादात तरुणानं नको तेच केलं; अंगावर काटा आणणारा VIDEO समोर
देशाच्या इतिहासात मोदींसारखा हुकुमशहा वाईट पंतप्रधान कधीच झाला नाही, आज घरातून बाहेर पडला नाही, तर या देशाचं काहीच होणार नाही; अभिजित दीपकेंचा सडकून प्रहार, सोनम वांगचुकना फरफटत नेताच अश्रु अनावर
देशाच्या इतिहासात मोदींसारखा हुकुमशहा वाईट पंतप्रधान कधीच झाला नाही, आज घरातून बाहेर पडला नाही, तर या देशाचं काहीच होणार नाही; अभिजित दीपकेंचा सडकून प्रहार, सोनम वांगचुकना फरफटत नेताच अश्रु अनावर
Sonam Wangchuk Wife : दिल्ली पोलिसांनी बळजबरीने सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं; आता पत्नीने मौन सोडलं, म्हणाल्या, 'माझ्या संमतीशिवाय....
दिल्ली पोलिसांनी बळजबरीने सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं; आता पत्नीने मौन सोडलं, म्हणाल्या, 'माझ्या संमतीशिवाय....
Embed widget