Ganesh Chaturthi 2022 : गणपती बाप्पाच्या आगमनाने सर्वत्र प्रसन्न वातावरण निर्माण होते. कोरोनामुळे गेल्या काही वर्षांत नकारात्मक वातावरण तयार झालं होतं. पण यंदा मात्र बाप्पाचं स्वागत जल्लोषात करण्यात येणार आहे. असे असले तरी गणपती बाप्पाचं आगमन झाल्यानंतर म्हणजे गणेश चतुर्थीच्या रात्री चंद्रदर्शन करू नये असे म्हटले जात आहे. जाणून घ्या यामागचं नक्की कारण काय...


चंद्रदर्शन का करू नये...काय आहे कथा?


गणेश चतुर्थीच्या रात्री चंद्रदर्शन करू यासंबंधी पिढ्यानपिढ्या एक कथा सांगितली जाते. एकेदिवशी लाडके बाप्पा मुषकावर सवार होऊन मोठ्या लगबगीने कुठे तरी जात होते. तेव्हा त्या गडबडीत असताना ते घसरले. दरम्यान त्यांना घसरताना पाहून चंद्र जोरजोरात हसू लागला. त्यामुळे गणपती बाप्पाला खूप राग आला आणि त्याने चंद्राला शाप दिला. बाप्पा म्हणाला, "आजपासून तुझं तोंड कोणी नाही पाहणार. जो तुझं तोंड पाहील त्याच्यावर चोरीचा खोटा आळ येईल".  


गणपती बाप्पाच्या या बोलण्याने चंद्र चांगलाच घाबरला. गणेशाला प्रसन्न करण्यासाठी त्याने मोठे तप केले. चंद्राच्या भक्तीने बाप्पादेखील प्रसन्न झाले आणि त्यांनी चंद्राला शापातून मुक्त केलं. पण तरीही गणेश चतुर्थीला तुझं तोंड कोणी पाहणार नाही. जो तुझं तोंड पाहील त्याच्यावर चोरीचा खोटा आळ येईल" ही अट कायम ठेवली. 


त्यानंतर चंद्राने बाप्पाकडे विनंती केली की,"जर एखाद्याने चुकून त्या दिवशी चंद्राचे दर्शन केले तर त्याने काय करावे. माझ्या चुकीची शिक्षा एखाद्या निष्पाप व्यक्तीला नको". त्यावर बाप्पाने सांगितलं की,"संकष्ट चतुर्थी व्रत केल्यास खोट्या आळातून त्या व्यक्तिची सुटका होईल. म्हणून चुकून चंद्रदर्शन झाले की, घाबरुन जाऊ नका". 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.


संबंधित बातम्या


Ganesh Chaturthi Recipe : बाप्पाच्या नैवेद्यामध्ये हमखास समावेश असणाऱ्या उकडीच्या मोदकांची रेसिपी जाणून घ्या...


Ganesh Chaturthi 2022 : एबीपी माझाची गौराई सजावट स्पर्धा! तुमच्या गौरींच्या सजावटीचे फोटो पाठवा आणि बक्षिसं जिंका