एक्स्प्लोर
पूर्व विदर्भातून मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल
मुंबई : संपूर्ण महाराष्ट्र ज्याची आतुरतेने वाट पाहात आहे, तो मान्सून पूर्व विदर्भातून महाराष्ट्रात दाखल झाला असल्याची माहिती पुणे वेधशाळेच्या संचालिका सुनितादेवी यांनी दिली.
प्रतिकुल वातावरणामुळे लांबलेल्या मान्सूनचे वारे दोन दिवसात महाराष्ट्रभर पसरतील. त्यासाठी पोषक वातावरण तयार झाल्यानं सोमवारपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल, असा अंदाज त्यांनी यावेळी व्यक्त केला.
गेल्या आठवड्यात मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर पोहोचला होता. मात्र, वातावरणात झालेल्या बदलांमुळे त्याचं आगमन काहीसं लांबलं होतं. पण आता पूर्व किनारपट्टीवर वातावरणात झालेल्या बदलांमुळे मान्सूनने यंदा पूर्व विदर्भामार्गे महाराष्ट्रात एन्ट्री घेतली आहे.
सर्वसाधारण वाटचालीचा विचार करता आठ दिवस उशिराने विदर्भात आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement