एक्स्प्लोर

वानराने मंदिरात मारुतीरायाला दंडवत घालत प्राण सोडले!

एक वानर थेट मंदिरात आले आणि गाभाऱ्याच्या बाहेर दंडवत घालू लागले. दंडवत घातल्यानंतर आहे त्या ठिकाणीच त्या वानराने आपला जीव सोडला.

सांगली : मिरज तालुक्यातल्या गुंडेवाडी गावातील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात शनिवारी सकाळी आश्चर्यकारक घटना घडलीय. गावातीलच हनुमान मंदिरात एका वानराने मारुतीरायाला दंडवत घालत आपले प्राण सोडले. शनिवारी गावातील नागरिक मंदिरात बजरंगबलीची मनोभावे पुजा, आरती करत होते. यावेळी एक वानर थेट मंदिरात आले आणि गाभाऱ्याच्या बाहेर दंडवत घालू लागले. दंडवत घातल्यानंतर आहे त्या ठिकाणीच त्या वानराने आपला जीव सोडला. ही घटना मंदिरात असलेल्या नागरिकांनी मोबाईल मध्ये कैद केली. नागरिकांना देखील मंदिरात घडलेला हा प्रकार आश्चर्यकारक वाटतो आहे.

मिरज तालुक्यातल्या गुंडेवाडी गावातील हे आहे पुरातून दक्षिणमुखी हनुमान मंदिर. या मंदीरात शनिवारी सकाळी आश्चर्यकारक घटना घडलीय ज्याची सध्या गावात आणि पंचक्रोशीत बरीच चर्चा आहे. नेमके या मंदिरात काय घडले ते व्हिडीओ पाहिले की लक्षात येते. माणसं जशी सहजपणे मंदिरात येऊन दर्शन घेतात अगदी तशाच पध्दतीने एका वानराने हनुमानाच्या मूर्तीचे दंडवत घालत दर्शन घेतले. समोरील मूर्ती, बाजूच्या मूर्तीचे दर्शन घेत असलेल्या या वानराचा व्हिडीओ नागरिकांनी कॅमेऱ्यात कैद केला आहे. विशेष म्हणजे दंडवत घालून झाल्यानंतर या वानराने आहे त्या जागीच प्राण सोडला. हीच घटना नागरिकांसाठी धक्कादायक आणि आश्चर्यकारक ठरली.

अनेकांसाठी ही घटना आश्चर्यचा धक्का देणारीच होती. पण गावातील हे हनुमान मंदिर प्राचीन असल्याने या मंदिरात ही घटना घडल्याने अनेकजण वेगवेगळे अर्थ लावत आहेत. शनिवारी भाविक बजरंगबलीची मनोभावे पूजा करतात. त्याच शनिवारी या वानर मंदिरात आल्याने आणि त्याने दंडवत घालून प्राण सोडल्याने नागरिकांत आश्चर्य व्यक्त होत आहे. वानराने प्राण सोडल्यानंतर वानराचे दर्शन घेऊन नागरिकांनी मंदिराशेजारी त्याचे अंत्यसंस्कार पार पाडले.

एखादे वानर हनुमान मंदिरात येते आणि मूर्तीला दंडवत घालून आपला प्राण सोडते ही गोष्ट अनेक अर्थाने नागरिकांसाठी चर्चेची आणि आश्चर्यकारक गोष्ट बनली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
रात्रभरच्या धरणे आंदोलनाची कुणकूण लागताच दिल्ली पोलिसांनी राहुल गांधींना हातापायाला धरून उचललं, ज्ञानेश कुमारांविरोधात पाच दिवसांत सातव्यांदा एल्गार
रात्रभरच्या धरणे आंदोलनाची कुणकूण लागताच दिल्ली पोलिसांनी राहुल गांधींना हातापायाला धरून उचललं, ज्ञानेश कुमारांविरोधात पाच दिवसांत सातव्यांदा एल्गार
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
सावंत बंधू पुन्हा एकत्र! गैरसमज दूर, एकत्र होतो, आहोत आणि सदैव राहू, पृथ्वीराज सावंतांची भावनिक पोस्ट, विरोधकांना टोला
सावंत बंधू पुन्हा एकत्र! गैरसमज दूर, एकत्र होतो, आहोत आणि सदैव राहू, पृथ्वीराज सावंतांची भावनिक पोस्ट, विरोधकांना टोला

व्हिडीओ

Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही
India Alliance Protest Delhi : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत आज आंदोलन
Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
Drought Action Plan Maharashtra : राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
Satej Patil : मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
Hingoli: हिंगोलीत अग्नितांडव! आगीत होरपळून दोन मृत्यू होताच प्रशासनाला जाग; धडक कारवाईत सुमारे 2 क्विंटल फटाके जप्त
हिंगोलीत अग्नितांडव! आगीत होरपळून दोन मृत्यू होताच प्रशासनाला जाग; धडक कारवाईत सुमारे 2 क्विंटल फटाके जप्त
Embed widget