एक्स्प्लोर

मोहसीनचा संघर्ष जिंकला, वीटभट्टीवर काम करुन सीए झाला!

वयाच्या पाचव्या वर्षापासून वीटभट्टीवर काम करणारा तरुण चार्टड अकाऊटंट अर्थात सीए झाला आहे.

लातूर: लातूरच्या मोहसिन शेख या 25 वर्षाच्या तरुणानं एक इतिहास घडवला आहे. वयाच्या पाचव्या वर्षापासून वीटभट्टीवर काम करणारा हा तरुण चार्टड अकाऊटंट अर्थात सीए झाला आहे. पहाटे पाच वाजता उठायचं...सात वाजेपर्यंत काम करायचं...सात वाजता अर्धा किलोमीटर अंतरावरच्या शाळेत चालत जायचं. साडे बारला जेवण संपवून 1 ते रात्री 9 पर्यंत वीटभट्टीवर काम. दहा ते दोन अभ्यास, अशा कठीण परिस्थितीत मोहसिननं मिळवलेलं यश जबरदस्त आहे. त्याची बुध्दी पाहून शिर्डीच्या साई बाबा मंदिराचं ऑडिट करणाऱ्या सीए फर्मनं मोहसिनला पार्टनर केले आहे. मोहसिनचा संघर्ष शेख कुटुंबात अठरा विश्व दारिद्र्य. मोहसिनचे वडील दारुच्या आहारी, आई आणि भाऊ- बहिणी वीट भट्टीवर काम करुन पोट भरतात. मोहसिनला समज येऊ लागली तेव्हापासून तोही आईच्या साथीने वीटभट्टीवरच कामाला लागला. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे मोहसिनला मावशीकडे पाठवलं. मावशीची परिस्थितीही फार ग्रेट होती असं नाही. मावशीही वीटभट्टीवरच काम करते. मोहसिनचं बालपण मावशीकडेच गेलं. पहाटे पाच वाजता उठायचं...सात वाजेपर्यंत वीटभट्टीवर काम करायचं...सात वाजता अर्धा किलोमीटर अंतरावरच्या शाळेत चालत जायचं. साडेबारापर्यंत शाळा करुन एक वाजता वीट भट्टीवर यायचं. मग 1 ते 9 काम करायचं. रात्री दहाला घरी पोहोचल्यावर रात्री 2 पर्यंत अभ्यास करायचा, असा संघर्ष मोहसिनच्या यशामागे आहे.  “ज्यादिवशी पाऊस पडायचा तो माझ्यासाठी आनंदाचा दिवस असायचा. कारण त्यादिवशी वीटभट्टीवर काम नसायचं. पण त्यादिवशी वीटा वाहून नेण्याचं काम करावं लागत असे. आजही आई-मावशी तेच काम करतात. आई, भाऊ, मावशी यांना माझ्याबद्दल सकारात्मकता वाटायची. मी काही तरी करुन दाखवेन असं त्यांना नेहमी वाटत असे. त्यामुळे त्यांनी मला हवी ती मदत केली. सीएच्या नोंदणीसाठी माझ्याकडे पैसे नव्हते, तेव्हा भावाने एन्गेजमेंट रिंग विकून पैसे दिले, असं मोहसिन सांगतो. एखाद दिवशी काम खूप असेल तर शाळेत जाऊ नकोस असं मावशी सांगायची. पण त्यादिवशी मला खूप वाईट वाटायचं, मी जेवत नसे, नाराज असे, असं मोहिसनने सांगितलं. खर्च कमी असतो त्यामुळे सीएचं क्षेत्र निवडलं. या काळात मला अनेकांनी मदत केली, त्यामुळेच आजचं यश पाहू शकतो, असं तो म्हणाला. चार वर्षापूर्वी जेव्हा तयारी सुरु केली, तेव्हा अनेक प्रस्थापित सीएंनी मोहसिनकेड तुच्छतेने पाहिलं. अंथरुण पाहून पाय पसरावं, असं सीएंनी मोहसिनला सुनावलं. मात्र मी सचिन शिंदे सरांची फर्म जॉईन केली, तेव्हा त्यांनी मला दुसऱ्या तिसऱ्याच दिवशी सांगितलं, तुझं भविष्य उज्ज्वल आहे, तू ज्या दिवशी सीए होशील, त्यादिवशी तुला मी माझ्या फर्ममध्ये पार्टनर म्हणून घेणार, असं त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं, तो शब्द त्यांनी पाळला, असं मोहसिन म्हणाला. VIDEO:

महत्त्वाच्या बातम्या

गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला फोनवर धमकी,
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला फोनवर धमकी, "तुझा नेक्स्ट गेम" म्हणत पाठवला मेसेज, कुटुंबीय भीतीच्या छायेत
सांत्वनाला आलेल्या प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबाने आक्रोश मांडला; म्हणाले, मीनाक्षी शिंदेला तात्काळ हटवा
सांत्वनाला आलेल्या प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबाने आक्रोश मांडला; म्हणाले, मीनाक्षी शिंदेला तात्काळ हटवा

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
Abhijeet Dipke: सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
Gokul Election: कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा थेट व्हिडिओ व्हायरल
कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा व्हिडिओ व्हायरल
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला फोनवर धमकी,
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला फोनवर धमकी, "तुझा नेक्स्ट गेम" म्हणत पाठवला मेसेज, कुटुंबीय भीतीच्या छायेत
UP News : एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...

Embed widget