एक्स्प्लोर

मोबाईलमध्ये गेम खेळताना स्फोट, नांदेडमध्ये आठ वर्षाच्या मुलाने हात गमावला

मोबाईलचा मोठा स्फोट झाला आणि प्रशांतच्या डाव्या हाताच्या तळव्यासह पाचही बोटे अक्षरशा तुटून पडली. हा स्फोट इतका भयानक होता की त्याचा तळहात छिन्नविछिन्न होऊन मोबाईलचे तुकडे त्याच्या छातीत, पोटात घुसून त्याला मोठी दुखापत झाली आहे.

नांदेड : नांदेडमध्ये मोबाईलवर गेम खेळत असताना स्फोट झाल्याने एका लहानग्याला आपला हात गमवावा लागला आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील जिरगा गावात हा प्रकार घडला आहे. प्रशांत जाधव (वय 8 वर्ष) असे या मुलाचे नाव आहे. मुखेड तालुक्यातील कमलातांडा जिरगा तांडयावरील श्रीपत जाधव या शेतकऱ्याने टीव्हीवरील मोबाईलची जाहिरात पाहून मोबाईलची ऑनलाईन मागणी केली होती.  1500 रुपयांना तीन मोबाईल आणि त्यावर एक घड्याळ मोफत अशी आय कॉल के 72 (I KALL k72) या कंपनीची जाहिरात पाहून  श्रीपत जाधव यांनी मोबाईलची मागणी केली. मोबाईलमध्ये गेम खेळताना स्फोट, नांदेडमध्ये आठ वर्षाच्या मुलाने हात गमावला त्या तीन मोबाईलपैकी एक मोबाईल गेल्या एक ते दीड महिन्यांपासून ते वापरत होते. त्या मोबाईलवर त्यांचा मोठा मुलगा प्रशांत जाधव हा नेहमीप्रमाणे गेम खेळत बसला होता. यावेळी अचानक मोबाईलचा मोठा स्फोट झाला आणि प्रशांतच्या डाव्या हाताच्या तळव्यासह पाचही बोटे अक्षरशा तुटून पडली. हा स्फोट इतका भयानक होता की त्याचा तळहात छिन्नविछिन्न होऊन मोबाईलचे तुकडे त्याच्या छातीत, पोटात घुसून त्याला मोठी दुखापत झाली आहे. मोबाईलमध्ये गेम खेळताना स्फोट, नांदेडमध्ये आठ वर्षाच्या मुलाने हात गमावला या घटनेने प्रशांतच्या कुटुंबीयावर मोठा आघात झाला आहे. या घटनेमुळे बाऱ्हाळी परिसरात मोबाईल वापरासाठी भीतीचे वातावरण पसरले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Vijay Wadettiwar : जो-जो मोदींच्या, चोर ज्ञानेश कुमारच्या विरोधात आंदोलन करेल, त्या सर्वांना आमचा पाठिंबा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, म्हणाले, होळीपर्यंत महायुतीचे सरकार नष्ट होईल
जो-जो मोदींच्या, चोर ज्ञानेश कुमारच्या विरोधात आंदोलन करेल, त्या सर्वांना आमचा पाठिंबा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, म्हणाले, होळीपर्यंत महायुतीचे सरकार नष्ट होईल
किलोला 500 रुपये मिळवून देणारा हुरडा यंदा करपला! संभाजीनगरच्या 2 गावातल्या 14 कोटींच्या उलाढालीवर दुष्काळ संकट
किलोला 500 रुपये मिळवून देणारा हुरडा यंदा करपला! संभाजीनगरच्या 2 गावातल्या 14 कोटींच्या उलाढालीवर दुष्काळ संकट
Maharashtra Live blog updates: मालेगाव शहरात आजपासून 10 मिनिटांची पाणी कपात
Maharashtra Live blog updates: मालेगाव शहरात आजपासून 10 मिनिटांची पाणी कपात
Shardiya Navratri 2026: ना बसायचं, ना झोपायचं! चक्क 9 दिवस उभं राहून देवीचा जागर? साताऱ्यातील 'या' गावची 350 वर्षांची अनोखी परंपरा!
ना बसायचं, ना झोपायचं! चक्क 9 दिवस उभं राहून देवीचा जागर? साताऱ्यातील 'या' गावची 350 वर्षांची अनोखी परंपरा!

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amravati Teacher Constituency : अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीत वाद पेटला! वंचितच्या पाठिंब्यासाठी एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; खास दूत 'राजगृहा'वर
अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीत वाद पेटला! वंचितच्या पाठिंब्यासाठी एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; खास दूत 'राजगृहा'वर
Pune News: पुण्यात ‘रॅपिडो’ची ‘बाईक टॅक्सी’ बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे ‘पुणे आरटीए’च्या बैठकीत आदेश, नेमकं काय आहे कारण?
पुण्यात ‘रॅपिडो’ची ‘बाईक टॅक्सी’ बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे ‘पुणे आरटीए’च्या बैठकीत आदेश, नेमकं काय आहे कारण?
Malegaon Crime News : डोंगराळे खटल्यात फाशीचा निकाल, पण आरोपीच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नाही, उज्ज्वल निकम म्हणाले 'मुलगी त्याला दादा म्हणायची...'
डोंगराळे खटल्यात फाशीचा निकाल, पण आरोपीच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नाही, उज्ज्वल निकम म्हणाले 'मुलगी त्याला दादा म्हणायची...'
Who is Manarah Al Nahyan: तब्बल 300 अब्ज डॉलरची संपत्ती असलेल्या अबू धाबीच्या सत्ताधारी राजघराण्याची सून लंडनरच्या रस्त्यावर बेशुद्ध सापडली, कोर्टाची जबरी शिक्षा, नेमकं घडलं तरी काय?
तब्बल 300 अब्ज डॉलरची संपत्ती असलेल्या अबू धाबीच्या सत्ताधारी राजघराण्याची सून लंडनरच्या रस्त्यावर बेशुद्ध सापडली, कोर्टाची जबरी शिक्षा, नेमकं घडलं तरी काय?
Pradeep Purnekar Thane Crime: प्रदीप पूर्णेकरांना मारण्यासाठी पप्या शिंदे पायात चप्पलेऐवजी बूट घालून का आला? समोर आलं मोठं कारण
प्रदीप पूर्णेकरांना मारण्यासाठी पप्या शिंदे पायात चप्पलेऐवजी बूट घालून का आला? समोर आलं मोठं कारण
Reliance Industries on Elon Musk: मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
Nashik News: आदिवासी संस्कृतीचा जागतिक मंचावर मोठा सन्मान; 'शबरी नॅचरल्स'च्या पॅकेजिंगला जपानचा प्रतिष्ठेचा 'ग्लोबल गुड डिझाईन अवॉर्ड' जाहीर
आदिवासी संस्कृतीचा जागतिक मंचावर मोठा सन्मान; 'शबरी नॅचरल्स'च्या पॅकेजिंगला जपानचा प्रतिष्ठेचा 'ग्लोबल गुड डिझाईन अवॉर्ड' जाहीर
Pune Crime News: चॅंटिंग अन् पेमेंट स्क्रिनशॉट, खोट्या गुन्ह्यात अडकलण्याची धमकी, वारंवार फोन, पुण्यात 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलेल्या आयटी इंजिनिअरच्या लॅपटॉपमध्ये काय-काय सापडलं?
चॅंटिंग अन् पेमेंट स्क्रिनशॉट, खोट्या गुन्ह्यात अडकलण्याची धमकी, वारंवार फोन, पुण्यात 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलेल्या आयटी इंजिनिअरच्या लॅपटॉपमध्ये काय-काय सापडलं?
Embed widget