एक्स्प्लोर
औरंगाबादेत मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट, 12 वर्षीय मुलगा जखमी

औरंगाबाद: दिवसेंदिवस मोबाईलमुळे होणाऱ्या दुर्घटनेत वाढ होत आहे. औरंगाबादेत मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट होऊन 12 वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला आहे.
पडेगाव इथल्या मदरशात ही घटना घडली. या मुलावर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या मुलाने तोंडात बॅटरी पकडली होती. त्याचवेळी हा स्फोट झाला. या स्फोटामुळे मुलाच्या चेहऱ्यावर गंभीर इजा झाली आहे.
यापूर्वी मोबाईल चार्जिंग लावून बोलत असताना स्फोट झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट होऊन एका युवकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती.
तर फिनलँडमध्ये एक महिला स्मार्टफोन चार्जिंगला लावून झोपली असताना तिच्या उशाला स्मार्टफोनच्या बॅटरीचा स्फोट झाला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
करमणूक
कोल्हापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
