एक्स्प्लोर
चार बालकांच्या मृत्यूप्रकरणी संतप्त नातेवाईकांची डॉक्टरला मारहाण

अमरावती: डॉ.पंजाबराव देशमुख रूग्णालयातील 4 नवजात बालकांच्या मृत्यूप्रकरणी मनसे कार्यकर्ते आणि बालकांच्या नातेवाईकांकडून डॉ. भूषण कट्टा यांना मारहाण करण्यात आली आहे. डॉ. भूषण कट्टा हे बालकांच्या मृत्यू वेळी तिथेच ड्युटीवर होते आणि मुलांच्या मृत्यूला त्यांचा हलगर्जीपणाच जबाबदार आहे असा आरोप मृत बालकांच्या नातेवाईकांनी केला आहे. मनसे कार्यकर्ते आणि मृतांचे नातेवाईक मुलांच्या मृत्यूचे कारण विचारण्यास थेट डीन दिलीप जाणे यांच्या कार्यालयात गेले. त्यावेळी डॉक्टर भूषण कट्टा हे देखील तिथं उपस्थित होते. त्याचवेळी ही मारहाण करण्यात आली. त्यामुळे आता हे प्रकरण अधिक चिघळलं आहे. दरम्यान, बालकांचं शवविच्छेदन करायचं झाल्यास ते आमच्या आणि डॉक्टरांच्या एका टीमसमोर करण्यात यावं. तसेच त्यावेळी डॉ. भूषण हे देखील तिथे हजर असावेत अशी मागणी करण्यात आली आहे. काय आहे नेमकं प्रकरण? अमरावतीतील पंजाबराव देशमुख रुग्णालयात एकाच वेळी ४ नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या चारही नवजात मुलांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. काल रात्री (रविवार) ही घटना घडली आहे. एकाच वेळी चार नवजात बालकांचा मृत्यू झाल्यानं त्यांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करत डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पंजाबराव देशमुख रुग्णालयात मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातून लोक उपचारासाठी येत असतात. रुग्णालयात उपचार सुरु असतानाच बालकं दगावल्याची माहिती समजते आहे. याप्रकरणी आता पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस आणि रुग्णालयातील एक टीम या प्रकाराची चौकशी करणार आहे. त्यामुळे चौकशीनंतरच या बालकांच्या मृत्यूचं नेमकं कारण समजू शकेल. संबंधित बातम्या: डॉ. पंजाबराव देशमुख रुग्णालयात एकाच वेळी 4 नवजात बालकांचा मृत्यू
Before You Go
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















