Raj thackeray  : पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांचा एक व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. राज ठाकरे यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 'अमरावतीसारखा प्रयत्न पुन्हा महाराष्ट्रात झाल्यास सोडायचं नाही.' असा इशाराच राज ठाकरे यांनी दिला आहे. शिवाय नवीन वर्षांपासून धुमधडाका सुरू करू, या राज ठाकरे यांच्या भाषणातील मुद्यामुळे हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. 
 
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे राज्यातील महत्त्वाची शहरे पिंजून काढत आहेत. नुकताच त्यांनी नाशिक, औरंगाबाद आणि पुणे दौरा केला. या दौऱ्यात राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. शिवाय कार्यकर्त्यांना अनेक सूचनाही केल्या आहेत. औरंगाबादमध्ये झालेल्या कार्यकर्त्यांसोबतच्या संवादारम्यान राज ठाकरे यांनी असेक सूचना दिल्या. त्यासोबतच कार्यकर्त्यांमध्ये बळ यावं असे अनेक मुद्दे राज ठाकरे यांनी यावेळी मांडले.  


"नवीन वर्षापासून धुमधडका सुरू करू. येथून परत घरी जाल त्यावेळी प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरावर आणि घराजवळील चौकात  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा पाहिजे." अशा सूचनांसोबतच "आमरावतीसारखा प्रयत्न पुन्हा महाराष्ट्रातत झाल्यास सोडायचं नाही." असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. त्यामुळे त्यांचा हा व्हिडिओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.  


 
संदीप देशपांडे यांची प्रतिक्रीया
दरम्यान, राज ठाकरे यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी यावर प्रतिक्रीया दिली आहे. 
" आमरावतीसारख्या घटना घडवून महराष्ट्राचं वातावरण अस्थिर केलं जात आहे. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी हे वक्तव्य केले आहे." असे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे. 


Raj Thackeray on Amravati : अमरावतीसारखा प्रकार पुन्हा झाला तर सोडायचं नाही. पाहा व्हिडिओ 



महत्वाच्या बातम्या 


Raj Thackeray : ज्यांनी पेपर फोडला, ते अजून फुटले नाहीत, म्हणून पेपर वारंवार फुटतो : राज ठाकरे


ST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांना समजून घेणं गरजेचं : राज ठाकरे