Datta Jayanti 2021 : राज्यभर दत्त जयंतीचा उत्साह पाहायला मिळत आहे. नरसोबाची वाडी, (Narsobachi Wad)अक्कलकोटसह (Akkalkot ) राज्यातील प्रमुख दत्त मंदिरांमध्ये भाविकांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. दत्त जयंतीनिमित्त सर्व मंदिरांना आकर्षक रोषणाई करण्यात आलीय. गेल्या वर्षी दत्त जयंतीवर कोरोनाचं सावट होतं. मात्र यंदा कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानं दत्त जयंती उत्साहात साजरी होताना दिसून येत आहे. 


श्री दत्त जयंती निमित्त अक्कलकोट स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी देखील भाविकांची मोठी गर्दी असते. संध्याकाळी सहा वाजता अक्कलकोटच्या स्वामी समर्थ (swami samarth)मंदिरात दत्तजन्म सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी केवळ महाराष्ट्रच नाही तर कर्नाटक, आंध्र, तेलंगाना इत्यादी राज्यातून देखील भाविक मोठ्या प्रमाणात अक्कलकोट येथे येत असतात. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. 


भाविकांची गर्दी पाहता वाहतूककोंडीची समस्या होऊ नये म्हणून ठीक ठिकाणी पोलिस तैनात करण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मास्क बंधनकारक करण्यात आले आहे. सोशल डिस्टन्स राखून टप्याटप्प्यांमध्ये भाविकांना दर्शनासाठी मंदिरात प्रवेश दिला जातोय. श्री दत्ताचा अवतार समजल्या जाणाऱ्या स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अगदी पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केली आहे.


नाशिक जिल्ह्यातील महानुभाव पंथीयांचे श्रद्धास्थान असलेल्या शिंगवे येथील एकमुखी दत्त जयंती यात्रा असते. कोरोनामुळे यात्रा रद्द झाली असली तरी दर्शनाला मात्र सुरू ठेवण्यात आले आहे. तीन दिवस ही यात्रा सुरू असते.


शिर्डीमध्येही दत्तजयंती व सलग सुट्यांमुळे शिर्डीत भाविकांची गर्दी झाली आहे. सकाळपासून शिर्डीत भाविकांची मांदियाळी आहे. अनेक पायी पालख्या दत्त जयंती निमित्त शिर्डीत दाखल झाल्या आहेत. साईनामाच्या जयघोषाने शिर्डी नगरी दुमदुमली आहे. दत्त जयंतीच्या निमित्तानं मंदिर व परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha





इतर महत्त्वाच्या बातम्या :