एक्स्प्लोर

इंजिन 'वेळ' साधणार, मनसे-राष्ट्रवादी युतीची नांदी?

आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातल्या तीन जागा राष्ट्रवादी सोडाव्यात, अशी मनसेची 'मनसे' इच्छा आहे. त्यात ठाणे, नाशिक आणि मुंबईचा समावेश आहे. मोबदल्यात मनसे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला महाराष्ट्रात साथ देईल, अशी डील होऊ शकते.

मुंबई : एकीकडे शिवसेना-भाजप युती होणार की नाही, याची खलबतं सुरु असतानाच दुसरीकडे राज्यात एका वेगळ्याच समीकरणाची चर्चा सुरु झाली आहे. आगामी निवडणुकांमध्ये मनसे आणि राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. दोन्ही पक्षांमध्ये एकत्र येण्यासंदर्भात चर्चा सुरु असल्याची माहिती आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातल्या तीन जागा राष्ट्रवादी सोडाव्यात, अशी मनसेची 'मनसे' इच्छा आहे. त्यात ठाणे, नाशिक आणि मुंबईचा समावेश आहे. मोबदल्यात मनसे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला महाराष्ट्रात साथ देईल, अशी डील होऊ शकते. मनसेची तीन ते चार जागांची मागणी असली, तरी राष्ट्रवादी मात्र एक-दोन जागांवरच सकारात्मक आहे. राष्ट्रवादीकडून लोकसभेच्या उमेदवारांची यादी जवळपास तयार असून केवळ ठाण्याच्या जागेबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. ही जागा मनसेसाठी सोडली जाऊ शकते. सध्या तरी हे सगळं चर्चेच्या पातळीवर असल्याचं म्हटलं जातं. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मात्र सावध प्रतिक्रिया दिली आहे. एकीकडे भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची भेट घेऊन आघाडीत शिरण्याचे संकेत दिले आहेत. त्यातच मनसेही आघाडीच्या गोटात सामील झाली, तर निवडणुकीची रंगत अधिकच वाढू शकते. नुकतंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुलाच्या लग्नाच्या निमित्ताने अख्खं पवार कुटुंब मुंबईत आलं होतं. त्याआधी पुण्यात राज ठाकरे यांनी शरद पवारांची प्रकट मुलाखत घेतली होती. याशिवाय 'माझा'च्या 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' या कार्यक्रमाला येताना दोघांनी एकत्र विमानप्रवासही केला होता. त्यामुळे ठाकरे आणि पवारांची ही जवळीक नवी राजकीय दिशा घेणार का? हाच सवाल आहे.

महत्त्वाच्या बातम्या

चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश

मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न

मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ

मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस

व्हिडीओ

Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप
Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेतून 92 लाख लाभार्थी वगळले
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India : टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
INDW vs ENGW: भारताच्या लेकींनी लॉर्डसवर इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, क्रांती गौड, यास्तिका भाटियाची दमदार कामगिरी
भारताच्या लेकींनी इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, लॉर्डसवरील पहिल्याच कसोटीत विजयाचा झेंडा रोवला
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मुंबईतील सिमेंट रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पाची SIT चौकशी करा; अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका, काँग्रेसचा इशारा

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2026 | सोमवार

Embed widget