राजस्थान,मध्य प्रदेश,छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरम या 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांमधली 15 वर्षांपासूनची सत्ता भाजपने गमावली. त्यासोबत राजस्थानमधली गेल्या 5 वर्षांपासूनची सत्ता गमावली आहे. तसेच तेलंगणा आणि मिझोराम या राज्यांमध्येही भाजपाने निराशाजनक कामगिरी केली आहे. भाजपच्या या पराभवानंतर राज ठाकरे यांनी त्यांचा व्यंगचित्रांच्या माध्यमातून मोदी आणि भाजपवर बोचरी टिका केली आहे.
काय आहे व्यंगचित्रात
या पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेच्या खुर्तीत बसलेले आहेत, त्यांच्यामागे भाजप अध्यक्ष अमित शहा ही खुर्ची पकडून उभे आहेत. परंतु या खुर्चीखालची जमीन सरकल्याचं दाखवले आहे. तसेच जमिनीला मोठी भेग पडली आहे. या व्यंगचित्रावर "तडा, कधीही न भरुन निघणारा" असे कॅप्शन दिले आहे. राज ठाकरेंनी त्यांच्या अधिकृत ट्विटर आणि फेसबुकवर हे व्यंगचित्र पोस्ट केल्यानंतर नेटीझन्सनी या व्यंगचित्राला पसंतीची पावती दर्शवली आहे.