मुंबई : राम मंदिर सोडा, विकासाचा मार्ग धरा, असा घरचा आहेर खासदार संजय काकडे यांनी भाजपला दिला आहे. छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजपचा पराभव होईल हे वाटतं होत, मात्र मध्य प्रदेशमधील निकाल आमच्यासाठी धक्कादायक आहे.
शहरांची नावं बदलण्यात आणि राम मंदिराच्या नादात भाजपाने विकासाला दुर्लक्षित केलं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी म्हणतात हनुमान हे दलित होते. मात्र मी त्यांना म्हणतो की योगी साहेब तुम्ही मुख्यमंत्री आहात, तुम्ही विकासावर बोलायला पाहिजे, जातीवादावर नाही, असं विधान पुण्याचे भाजप खासदार संजय काकडे यांनी केला आहे.
हा पराभव भाजपासाठी चिंताजनक आहे. मी राजस्थानातील 40 मतदार संघात प्रचारच्या वेळी फिरलो, तेव्हाचं मला वाटल होतं की भाजप राजस्थानमध्ये येणार नाही. राजस्थानच्या पराभवाच्या प्रमुख कारण वसुंधरा राजे आहेत आणि पक्षाला तशा पूर्वसूचनाही मी दिल्या होत्या. तसेच कॉंग्रेसचे अशोक गहलोत, सचिन पायलट यांच्यासह कॉंग्रेसचे नेत्यांनी गल्लोगल्लीत जाऊन प्रचार केला, मात्र भाजप त्यात कमी पडला, असंही संजय काकडे म्हणाले.
राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, मिझोरम या विधानसभा निवडणुकांच्या निकालाचे कल हाती आले आहेत. या निकालात भाजपाची पिछेहाट होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राम मंदिर मुद्द्यावरुन खासदार संजय काकडे यांनी भाजपला घरचा आहेर दिला.
भाजप खासदार संजय काकडे यांचा पक्षाला घरचा आहेर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Dec 2018 04:07 PM (IST)
शहरांची नावं बदलण्यात आणि राम मंदिराच्या नादात भाजपाने विकासाला दुर्लक्षित केलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी म्हणतात हनुमान हे दलित होते. मात्र मी त्यांना म्हणतो की योगी साहेब तुम्ही मुख्यमंत्री आहात, तुम्ही विकासावर बोलायला पाहिजे, जातीवादावर नाही, असं विधान पुण्याचे भाजपचे खासदार संजय काकडे यांनी केला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -