एक्स्प्लोर

पुण्यात मेघ'राज'गर्जना; नियोजित सभा पावसामुळे रद्द

अनेक अडथळे पार करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेचे पुण्यात आयोजन केले होते. परंतु दुपारपासून पुण्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे राज ठाकरे यांना त्यांची नियोजित सभा रद्द करावी लागली आहे.

पुणे : अनेक अडथळे पार करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेचे पुण्यात आयोजन केले होते. परंतु दुपारपासून पुण्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. ज्या मैदानात राज ठाकरे सभा घेणार होते, ते मैदान चिखलमय झालं आहे. परिणामी राज ठाकरे यांना त्यांची नियोजित सभा रद्द करावी लागली आहे. सुरुवातीला राज ठाकरे यांच्या सभेसाठी पुण्यात मोठं मैदान उपलब्ध होत नव्हतं. अखेर मोठी शोधाशोध केल्यानंतर हा मैदानाचा प्रश्न मार्गी लागला. आज (9 ऑक्टोबर)पुण्यातल्या शुक्रवार पेठेतील सरस्वती संस्थेच्या मैदानात संध्याकाळी सहा वाजता राज यांची सभा होणार होती. या सभेद्वारे राज ठाकरे मनसेच्या विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार होते. परंतु पावसाने राज ठाकरेंच्या मनसुब्यांवर पाणी फेरले आहे. राज ठाकरेंची पुण्यात सभा, मात्र मैदानात चिखलाचं साम्राज्य | ABP Majha सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेकडून उमेदवार उभे करण्यात आले नव्हते. परंतु राज यांनी निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्याविरोधात प्रचार केला होता. 'लावरे तो व्हिडीओ'च्या माध्यमातून राज यांनी सत्ताधारी भाजपची पोलखोल केली होती. त्यामुळे या निवडणुकीत राज ठाकरे काय नवीन बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मनसेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षाने 1 ऑक्टोबर रोजी जिल्हा प्रशासनाला पत्र पाठवले होते. टिळक रस्ता आणि शनिवार पेठेतील रमणबाग शाळेतील मैदान सभेसाठी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी मनसेने या पत्राद्वारे केली होती. परंतु जिल्हा प्रशासनाने ही परवानगी नाकारली. परिणामी 5 ऑक्टोबरला होणारी राज ठाकरे यांची सभा पुढे ढकलण्यात आली. तसेच सभेसाठी पक्षाला दुसऱ्या मैदानांची शोधाशोध करावी लागली होती. 10 आणि 11 तारखेला राज ठाकरेंची तोफ मुंबईत धडाडणार | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe FDA : तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget