एक्स्प्लोर

पुणे, ठाणे, नागपूर, उल्हासनगर, मनसेचा थिएटरमधील लुटीविरोधात एल्गार

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नागपुरात पीव्हीआर या मल्टिप्लेक्समध्ये जाऊन आंदोलन केले.

नागपूर: मनसेने पुण्यानंतर आता नागपूरमध्येही थिएटरमधील लुटीविरोधात आवाज उठवला आहे. नागपुरात मल्टिप्लेक्समध्ये खाद्य पदार्थ विक्रीच्या नावाखाली प्रेक्षकांची लूट होत असल्याचा आरोप करत, आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नागपुरात पीव्हीआर या मल्टिप्लेक्समध्ये जाऊन आंदोलन केले. “नागपूरपासून मुंबईपर्यंत सर्वच ठिकाणी पीव्हीआरसारखे मल्टिप्लेक्स प्रेक्षकांना तीन ते पाच पट रकमेवर खाद्य पदार्थ विकून लुटत आहेत. एका आठवड्याच्या आत पीव्हीआरने ही लूट बंद करावी. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते राज ठाकरे यांच्या आदेशानंतर खळ्ळखट्याक करायला मागेपुढे पाहणार नाही” असा इशारा मनसैनिकांनी दिला. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी पीव्हीआरसमोर जोरदार घोषणाबाजी केली. पुण्यात मॅनेजरला मारहाण मल्टिप्लेक्सच्या मनमानीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी काल 29 जून रोजी पुण्यात निषेध केला. यासोबतच मल्टिप्लेक्समध्ये खाद्यपदार्थ अव्वाच्या सव्वा दराने विकत असल्याने थिएटर व्यवस्थापकला मारहाणही केली. किशोर शिंदे, महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष रमेश परदेशी आणि मनसैनिकांनी पुण्यातील सेनापती बापट मार्गावरील पीव्हीआरमध्ये गुरुवारी दुपारी जाऊन आंदोलन केलं. पाच रुपयांचे पॉपकॉर्न 250 रुपयांना कसे? 10 रुपयांचा वडापाव शंभर रुपयांना कसा? असे फलक घेऊन आणि घोषणा देऊन मनसैनिकांनी पीव्हीआर दणाणून सोडलं. मनसे कार्यकर्त्यांनी यावेळी पीव्हीआर व्यवस्थापनाला यासंदर्भातील निवेदनही दिलं. दरम्यान, मनसे कार्यकर्त्यांविरोधात पुण्यातील चतु:शृंगी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, मनसे कार्यकर्ते किशोर शिंदे आणि 10 ते 15 कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यात इशारा पुण्यानंतर ठाण्यात मनसे कार्यकर्त्यांनी मल्टिप्लेक्सवर धडक दिली. ठाण्यातल्या व्हीव्हीयाना मॉलमधल्या सिनेपोलिस मल्टिप्लेक्सवर मनसे कार्यकर्ते धडकले. खाद्यपदार्थांचे दर उद्यापर्यंत कमी करण्याचा अल्टीमेटम मनसेने दिला. उद्या दर कमी झाले नाहीत, तर सगळं फोडून टाकू, असा इशारा मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला. उल्हासनगर  मनसे कार्यकर्त्यांनी उल्हासनगरच्या अशोक अनिल मल्टिप्लेक्सवरही चाल केली. अवाजवी दराने खाद्यपदार्थांच्या विक्रीला विरोध करत, खाद्यपदार्थांचा रेटबोर्ड काढायला लावला. तसंच मल्टिप्लेक्सच्या मॅनेजरसोबत मनसे कार्यकर्त्यांची बाचाबाची झाली. हायकोर्टाचा सवाल मुंबईसह राज्यभरातील मल्टिप्लेक्स थिएटरमधील खाद्यपदार्थांच्या किंमतींवर राज्य सरकारचं नियंत्रण का नाही? पाच रुपयांचे पॉपकॉर्न 250 रुपयांत विकण्याचा अधिकार यांना कुणी दिला? असा सावल करत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला धारेवर धरलं. बॉम्बे पोलिस अॅक्टनुसार थिएटर मालकांवर करवाई करता येईल का? याचा तपशील सादर करा असे निर्देश देत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चार आठवड्यांत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. संबंधित बातम्या  5 रुपयांचे पॉपकॉर्न मल्टिप्लेक्समध्ये 250 रुपयांत का?: हायकोर्ट   5 रुपयांचे पॉपकॉर्न 250 रुपयांना का? पुण्यात मनसैनिकांची थिएटर मॅनेजरला मारहाण 

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 जुलै 2026 | रविवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 जुलै 2026 | रविवार
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
Nashik Crime News: चिकन व्यावसायिकाला अडवलं, 'गुटखा तस्करी'ची भीती दाखवून पैसेही उकळले; नंतर पुन्हा पैशांची मागणी करणारा लाचखोर पोलीस एसीबीच्या जाळ्यात अडकला, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
चिकन व्यावसायिकाला अडवलं, 'गुटखा तस्करी'ची भीती दाखवून पैसेही उकळले; नंतर पुन्हा पैशांची मागणी करणारा लाचखोर पोलीस एसीबीच्या जाळ्यात अडकला, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
Beed Crime News: दुचाकीवरून जाताना अडवलं, काही समजायच्या आतच हल्लेखोरांनी 23 वर्षीय तरुणाला भररस्त्यात संपवलं; घटनेनं बीडमध्ये खळबळ
दुचाकीवरून जाताना अडवलं, काही समजायच्या आतच हल्लेखोरांनी 23 वर्षीय तरुणाला भररस्त्यात संपवलं; घटनेनं बीडमध्ये खळबळ

व्हिडीओ

Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Goa Fort Ratnagiri: संवर्धनाच्या नावावर कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
Pune News: पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
Embed widget