एक्स्प्लोर

Ramdas Athawale on Raj Thackeray : बाळासाहेबांची कॉपी राज ठाकरे कधी करु शकत नाहीत : रामदास आठवले

बाळासाहेब ठाकरे हे एक वेगळं नेतृत्व होतं. त्यांची कॉपी राज ठाकरे कधी करु शकत नसल्याचे वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे.

Ramdas Athawale on Raj Thackeray : बाळासाहेब ठाकरे यांची कॉपी राज ठाकरे कधी करु शकत नाहीत. बाळासाहेब ठाकरे हे वेगळं नेतृत्व होतं. त्यांनी भोंगे काढा असे कधी म्हटलं नसल्याचे वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं. बाळासाहेब ठाकरे हे मुस्लिम विरोधी नव्हते, त्यांचा मुस्लिम समाजाला पाठिंबा होता. आंतकवादी मुस्लिमांच्या विरोधात ते होते असेही आठवले यावेळी म्हणाले.

दरम्यान, सगळ्या मुस्लिमांना त्रास देण्याची बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका नव्हती. त्यामुळे राज ठाकरे बाळासाहेबांची कॉपी करु शकत नाहीत असे माझे मत असल्याचे आठवले म्हणाले. बाळासाहेबांची कॉपी करणे एवढं सोप काम नाही. मी मनसे सांगतो की आम्हाला मनसेची अवशक्यता नाही. नरेंद्र मोदी यांची स्वतःची प्रतिमा आहे. चुकीच्या भूमिका मांडणाऱ्या लोकांची आवश्यकता नाही. भाजप त्यांना घेणार देखील नाही, भाजप स्वतः सक्षम असल्याचे आठवले म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज भीमा कोरेगाव प्रकरणी आपली साक्ष नोंदवणार आहेत. भीमा कोरेगावमध्ये  घडलेल्या हिंसचाराची चौकशी करणाऱ्या जे. एन. पटेल आयोगासमोर शरद पवार पवार साक्ष देणार आहेत. यावरुन आठवले यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले की, शरद पवार हे आज हजर राहणार असतील तर ते त्या संदर्भात त्यांची बाजू मांडतील. मात्र, आमचं म्हणणं आहे की भीमा कोरेगाव दंगल ही जाणीवपूर्वक घडवली गेली. त्या दंगलीचा आणि एल्गार परिषदेचा काहीही संबंध नाही. संभाजी भिडे यांना क्लिन चीट मिळाली असेल. कारण त्यांच्याविरोधात पुरावे नसतील. संभाजी भिडेंवर कारवाई व्हावी हीच आमची भूमिका आहे, आयोगाला त्या संदर्भात पत्र लिहू असेही आठवले यावेळी म्हणाले.

भोंगे काढण्याची भूमिका ही असंवैधानिक आहे. मस्जिदवर आहेत भोंगे, तुम्ही का करताय सोंगे असे म्हणत रामदास आठवले यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना टोला लगावला. मस्जिदवरील भोंग्याचा आवाज कमी करता येऊ शकतो, मात्र काढून टाका म्हणणे चुकीचे आहे. नवरात्रीला देखील आवाज असतो, बुद्ध पौर्णिमा देखील उत्साहात साजरी होते, पण मुस्लिमांनी कधी विरोध केला नसल्याचे आठवले यावेळी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

4 हजार क्विंटलपेक्षा जास्त साठा नको, 30 दिवसांचा कालावधी; पुरवठा विभागाचे आदेश, साखर साठेबाजीवर कारवाई होणार
4 हजार क्विंटलपेक्षा जास्त साठा नको, 30 दिवसांचा कालावधी; पुरवठा विभागाचे आदेश, साखर साठेबाजीवर कारवाई होणार
केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात सरकारी हॉस्पिटलची अनास्था; महिलेची रस्त्यावरच प्रसुती, मदतीला नाही कुणी
केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात सरकारी हॉस्पिटलची अनास्था; महिलेची रस्त्यावरच प्रसुती, मदतीला नाही कुणी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP Majha Impact : 'माझा'च्या बातमीचा दणका! मंत्रालयातील उसनवारी अधिकाऱ्यांचे पेकाट मोडले; सर्व प्रतिनियुक्त्या रद्द, मूळ विभागात परत धाडले
'माझा'च्या बातमीचा दणका! मंत्रालयातील उसनवारी अधिकाऱ्यांचे पेकाट मोडले; सर्व प्रतिनियुक्त्या रद्द, मूळ विभागात परत धाडले

व्हिडीओ

Brahmin Samaj Protest : उपोषणाशिवाय सरकारला भाषा कळत नाही, ब्राह्मण समाजाचा सरकारविरोधात एल्गार!
Sanjay Raut PC : ‘चहा सोडा’पासून फडणवीसांच्या दिल्लीवारीपर्यंत; संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल
Rahul Gandhi News : आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं देवेंद्र फडणवीसांना पत्र
Tukaram Mundhe on Loose Oil : रडारवर सुटं तेल गोरगरिबांची घालमेल Special Report
Mumbai Ganapti Hight : गणेशमूर्तींच्या उंचीसंदर्भात काय आहेत नियम? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BLOG : फ्रेडरिक डग्लस - गुलामांच्या अक्षरसज्जतेचा पहिला हुंकार!
BLOG : फ्रेडरिक डग्लस - गुलामांच्या अक्षरसज्जतेचा पहिला हुंकार!
केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात सरकारी हॉस्पिटलची अनास्था; महिलेची रस्त्यावरच प्रसुती, मदतीला नाही कुणी
केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात सरकारी हॉस्पिटलची अनास्था; महिलेची रस्त्यावरच प्रसुती, मदतीला नाही कुणी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Hindustan Copper : हिंदुस्तान कॉपरचा शेअर गडगडला, थेट 532 रुपयांवर पोहोचला, सरकारी कंपनीचा स्टॉक का घसरला?
हिंदुस्तान कॉपरचा शेअर गडगडला, थेट 532 रुपयांवर पोहोचला, सरकारी कंपनीचा स्टॉक का घसरला?
Onion Price Hike : केंद्र सरकार 5 शहरांमध्ये 35 रुपये किलोनं कांदा विकणार, नाशिकमधून कांदा एक्सप्रेस दिल्लीकडे रवाना होणार, शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा 
केंद्र सरकार कांदा 35 रुपये किलोनं 5 शहरांमध्ये विकणार, नाशिकचा कांदा दिल्लीच्या बाजारात पोहोचणार
राहुल गांधींसमोर आदिवासी उपोषणाचा मुद्दा, आता आदिवासी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी; हर्षवर्धन सपकाळ संतापले
राहुल गांधींसमोर आदिवासी उपोषणाचा मुद्दा, आता आदिवासी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी; हर्षवर्धन सपकाळ संतापले
Shivendraraje Bhonsle : कानबाई माता उत्सवात खान्देशी गाणं लागताच शिवेंद्रराजे थिरकले, पिंपरीत 'शिवरायांची तलवार' ऐकताच स्टेजवरील मंडळींचा ठेका
कानबाई माता उत्सवात खान्देशी गाणं लागताच शिवेंद्रराजे थिरकले, पिंपरीत 'शिवरायांची तलवार' ऐकताच स्टेजवरील मंडळींचा ठेका
Raigad Crime Crime : ताम्हिणी घाटात खोल दरीत आढळला महिलेचा मृतदेह; गळा आवळून संपवल्याचा संशय, 50 फूट दरीत...
ताम्हिणी घाटात खोल दरीत आढळला महिलेचा मृतदेह; गळा आवळून संपवल्याचा संशय, 50 फूट दरीत...
Embed widget