एक्स्प्लोर

"मी पटकन एकच नाव घेतले मा. छगन भुजबळसाहेब!" जितेंद्र आव्हाड यांच्या ट्वीटची चर्चा!

मंत्री छगन भुजबळ यांनी जितेंद्र आव्हाड यांची पाठराखण केली आहे. त्यानंतर आव्हाड यांनीदेखील भुजबळ यांचे आभार मनले आहेत.

 मुंबई : राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे नेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो अनावधानाने फाडल्यामुळे सध्या भाजपकडून त्यांच्याविरोधात राज्यभर आंदोलन केलं जात आहे. भाजपचे कार्यकर्ते आव्हाड यांचे फोटो जाळून ठिकठिकाणी आंदोलन करत आहेत. मात्र भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षाचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी मात्र आव्हाड यांची पाठराखण केली आहे. आव्हाड यांनी माफी मागितली आहे. केवळ विरोधक म्हणून त्यांच्यावर टीका करण्यात अर्थ नाही, असे भुजबळ म्हणाले आहेत. त्यांच्या याच भूमिकेवर आता आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी भुजबळ यांचा ऋणी राहील, असे आव्हाड म्हणाले आहेत. 

मी पटकन एकच नाव घेतले, मा. छगन भुजबळसाहेब !

आव्हाड यांनी ही प्रतिक्रिया एक्स (पूर्वीचे ट्विटर) या समाजमाध्यद्वारे दिली आहे. ते आपल्या ट्वीटद्वारे म्हणाले की, "भुजबळ साहेब, अनावधानाने काल माझ्याकडून चूक झाली आणि त्या चुकीबद्दल मी कालच जाहीरपणे नतमस्तक होऊन माफी मागितली. आज आपण त्याचा उल्लेख करीत मनुस्मृतीला विरोध केलाच पाहिजे, हा विचार पुढे आणला. मी आपला मनापासून आभारी आहे. मला काल चवदार तळ्यावर , आपल्या मागे इतर पक्षातील कोण उभे राहतील, असा प्रश्न विचारला असता, मी पटकन एकच नाव घेतले, मा. छगन भुजबळसाहेब ! आपल्या मनात बहुजन समाजाविषयी असलेले प्रेम अन् आपली भूमिका मला माहीत आहे. त्यामुळेच इतक्या अधिकाराने मी आपले नाव घेतले. आपण ज्या पद्धतीने माझ्या मागे उभे राहिलात त्याबद्दल मी आपला कायम ऋणी राहीन. मनुस्मृतीविरोधातील आपली लढाई आपण सगळे एकत्रित लढू, हीच आपली सर्वांची भूमिका असली पाहिजे," असे आव्हाड म्हणाले. 

मरन पत्करेन पण...

शिवसेना (ठाकरे गट) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीदेखील आव्हाड यांची पाठराखण केली. आव्हाड यांनी त्यांचेदेखील आभार मानले. "काल अनावधानाने झालेल्या प्रसंगा बद्दल मी लगेच जाहीर माफी मागितली. 185 किमीचा प्रवास करुन मी माझ्या बापाचा फोटो फाडायला गेलो असतो का. तुमच्यासारखे ह्या प्रसंगात सत्याच्या बाजूने उभे राहिले मी आपले आभारी आहे. मरन पत्करेन पण समजात जाती द्वेष आणि स्त्री द्वेशाची बीजे रोवणाऱ्या मनुला विरोध करणाऱ्या बापाची शिकवण विसरणार नाही," अशा भावना आव्हाड यांनी व्यक्त केल्या. 

छगन भुजबळ काय म्हणाले?

दरम्यान, छगन भुजबळ यांनीदेखील मनुस्मृतीतील श्लोकांचा शालेय अभ्याक्रमात समावेश करण्यास विरोध केला आहे. आव्हाड केवळ विरोधी पक्षातील आहेत म्हणून त्यांच्यावर टीका करण्यात अर्थ नाही. ते चांगल्या उद्देशासाठी महाडला गेले होते. त्यांच्याकडून अनावधानाने झालेल्या कृत्याची त्यांनी माफी मागितली आहे, अशी भूमिका छगन भुजबळ यांनी घेतली.  

हेही वाचा :

"केवळ विरोधक म्हणून आव्हाड यांच्यावर टीका करण्यात काही अर्थ नाही" : छगन भुजबळ

प्रज्वल ढगे हे 'एबीपी माझा ऑनलाईन'टीममध्ये 'कॉपी एडिटर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकारण, मनोरंजन, क्रीडाविषयक बातम्यांमध्ये विशेष रस आहे. त्यांनी याआधी 'लोकसत्ता', 'टीव्ही ९ मराठी' या माध्यमांत काम केलेले आहे.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
नाशिककरांसाठी पुढचे चार ते पाच तास महत्वाचे, 500 मिलीमीटर पाऊस पडण्याचा इशारा, NDRF च्या टीम तैनात
नाशिककरांसाठी पुढचे चार ते पाच तास महत्वाचे, 500 मिलीमीटर पाऊस पडण्याचा इशारा, NDRF च्या टीम तैनात
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ

व्हिडीओ

Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
Embed widget