आंदोलनावरून खोत-शेट्टी भिडले, खोत म्हणतात, 'हे काजू शेट्टी' तर शेट्टी म्हणाले, 'खोत भ्रमिष्ट झाले'
काय म्हणाले होते सदाभाऊ खोत
काल सदाभाऊ खोत यांनी आरोप करत म्हटलं होतं की, राजू शेट्टी आता हे काजू शेट्टी झाली आहेत आणि या भंपक माणसाला आता कोणी किंमत देत नाही. तसेच त्यांची अवस्था आता गावात देवाला सोडलेल्या वळू प्रमाणे झालेली आहे. शेतकऱ्यांनी शेट्टी यांना रेड्याप्रमाणे सोडले आहे. त्यामुळे आता काय करावं आणि काय नाही, हे सुचत नाही.या उलट राजू शेट्टी यांनी दूध दराच्या आंदोलनाचं नाटक केले आहे. बारामतीमध्ये आम्ही शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी पायी गेलो आणि त्याच ठिकाणी राजू शेट्टी मात्र आपल्या आमदारकीसाठी पाय चाटायला गेले. मात्र अजूनही राष्ट्रवादीने त्यांना आमदारकी दिलेली नाही. कारण राजू शेट्टी जाईल तिथे खंजीर खुपसतात हे त्यांना माहित आहे", अशी टीका खोत यांनी केली आहे. तसेच मला कोंबडीचोर म्हणणाऱ्या राजू शेट्टींनी चारशे एकर जमीन घेऊन ठेवली आहे. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार यांना मंत्रीपद मिळणार होतं. मात्र राजू शेट्टी यांनी स्वतःला मंत्रीपद हवे असल्याने भुयार यांना मंत्री पद मिळू दिले नाही, असा आरोप खोत यांनी केला आहे.
BLOG | सत्तेपायी मैत्री तुटली! या राजकारणाने चळवळीचा इस्कोट केला!
कोण आहेत देवेंद्र भुयार
विधानसभा निवडणुकीत जायंट किलर ठरलेले आमदार देवेंद्र भुयार. मोर्शी मतदारसंघातून भुयार यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निवडणूक लढवत चक्क राज्याच्या कृषीमंत्र्यांचाच पराभव केला. शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरुन आंदोलनं करणाऱ्या भुयारांनी कृषीमंत्री अनिल बोंडे यांचा पराभव करत विधानसभा गाठली. रुडमधील एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म झालेले देवेंद्र भुयार यांनी चळवळीच्या माध्यमातून हे यश मिळवले. त्यांचे आई वडील हे शेतकरी. भुयार यांच्या या यशाने पश्चिम महाराष्ट्रात असलेली स्वाभिमानी शेतकरी संघटना विदर्भात चांगले पाय रोवत आहे. शेतकरी, जनसामान्यांच्या हिताचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाला जेरीस आणणाऱ्या युवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देवेंद्र भुयार यांना 2016 मध्ये दोन वर्षांच्या तडीपारीची नोटीस बजावण्यात आली होती. भुयार यांच्या राजकारणाची सुरवात प्रहारचे आमदार बच्चू कडू यांच्यासोबत झाली होती. प्रहारमधून पंचायत समिती सदस्य ते जिल्हा परिषद सदस्य असा प्रवास झाल्यानंतर आता ते जायंट किलर ठरून आमदार झाले आहेत.
शेतकऱ्याच्या पोराकडून कृषीमंत्र्यांचा पराभव, 'स्वाभिमानी' किसानपुत्र देवेंद्र भुयार विधानसभेत