एक्स्प्लोर

‘आमदाराची राहुटी आपल्या गावी’, बच्चू कडूंचा स्तुत्य उपक्रम

आपल्या नवनवीन आंदोलनामुळे प्रशासनाला ‘सळो की पळो’ करुन सोडणारे अचलपूर मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू सध्या मतदारसंघातील गावा-गावात जाऊन, त्या ठिकाणी आपली राहुटी थाटतात.

अमरावती : जनतेतून निवडून आलेला लोकप्रतिनिधी, मग आमदार असो किंवा खासदार असो, किंवा अगदी नगरसेवकही, एकदा निवडून आले की, परत मतदारापर्यंत जात नाही. कोणतेही काम असेल तर लोकप्रतिनिधींच्या कार्यालयांच्या चकरा माराव्या लागतात. मात्र अचलपूर मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू यांनी ‘घंटो का काम मिंटो में’ अशा घोषणेसह जनतेच्या कामासाठी गावा-गावात राहुटी थाटून ग्रामस्थांची शासकीय कामे मार्गी लावली. 'आमदाराची राहुटी आपल्या गावी' या उपक्रमाद्वारे प्रशासन लोकांपर्यंत घेऊन जाण्याचा स्तुत्य प्रयत्न आमदार बच्चू कडू यांनी केला केला आहे. आपल्या नवनवीन आंदोलनामुळे प्रशासनाला ‘सळो की पळो’ करुन सोडणारे अचलपूर मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू सध्या मतदारसंघातील गावा-गावात जाऊन, त्या ठिकाणी आपली राहुटी थाटतात. बच्चू कडू यांच्यासोबत झेरॉक्स मशिन, फोटो काढायची मशीन, सेतू केंद्र, सर्व विभाग वेगवेगळ्या चार चाकीमध्ये असतात. त्याचसोबत, प्रशासनातील अधिकारीही असतात. अगदी नायब तहसीलदार, तलाठी, आरोग्य अधिकारी, पुरवठा अधिकारी, असे अधिकारी-कर्मचारीही सोबत असतात. ‘आमदाराची राहुटी आपल्या गावी’, बच्चू कडूंचा स्तुत्य उपक्रम जागेवरच लोकांची कामं करुन देतात, रेशन कार्ड असो, की श्रावण बाळ योजनेचा फॉर्म भरणे, वयाचा दाखला, अपंगांचा दाखला असो, अशी सगळी कामं एकाच वेळी सर्व अधिकारी सोबत असल्याने तात्काळ होत आहेत. या उपक्रमातून लोकांची कामं अवघ्या काही  मिनिटात होत असल्याने समाधान मिळत असल्याच्या भावना आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केल्या. त्याचसोबत येणाऱ्या काही काळात आता प्रत्येक गाव शासकीय कामांपासून वंचित राहणार नाही, असे विश्वासही आमदार बच्चू कडू यांनी बोलून दाखवला. ग्रामीण भागातील, तसेच म्हाताऱ्या,अशिक्षित लोकांना कोणत्याही कामासाठी तहसील च्या ठिकाणी गेल्यावर सरकारी बाबूच्या कामचुकार पनामुळे नाहक त्रास व पैशाचाही भुर्दंड सोसावा लागतो,पण या राहुटीत अनेक महिन्यापासून रखडलेली अनेकांची कामे मार्गी लागल्याचे खुद्द ग्रामस्थ सांगतात.

महत्त्वाच्या बातम्या

मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
आज आंदोलकांना घाबरवलं, उद्या सामान्य माणसालाही अडकवतील, धमकी देणाऱ्या पोलिसांचा मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब बंदोबस्त करावा : जयंत पाटील
आज आंदोलकांना घाबरवलं, उद्या सामान्य माणसालाही अडकवतील, धमकी देणाऱ्या पोलिसांचा मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब बंदोबस्त करावा : जयंत पाटील

व्हिडीओ

Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Embed widget