मुंबई : सरकारी कार्यालयात कोणते आणि कसे कपडे घालावेत याबाबत निर्देश राज्य सरकारने जाहीर केले होते. आता त्यानंतर मंत्रालयातील कर्मचारी, अधिकाऱ्यांना शिस्तीचे धडे देण्यासाठी आता राज्य सरकारनं कर्मचाऱ्यांनी कॉरिडोरमध्ये चहा पिऊ नये असं नवं परिपत्रक काढलं आहे.


मंत्रालयातून राज्य सरकारचा कारभार चालविण्यात येतो. लोकप्रतिनीधी, सर्वसामान्य नागरिक, अधिकारी हे त्यांच्या कामासाठी कार्यालयाला भेट देतात. अशा वेळी राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून सरकारी कार्यालयातील अधिकारी, कर्माचारी हे कोणत्याही वेळी चहा पितांना आढळतात. ही गोष्ट कार्यालयीन शिस्तीशी सुसंगत नाही. या मुळे शासकीय कर्मचाऱ्यांची जनमानसातील प्रतिमा मलिन होते. म्हणून शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना यापुढे कॉरिडोरमध्ये चहा उपलब्ध करून देण्याऐवजी ट्रे सर्विस द्वारे चहा पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


सर्व राज्य शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा कार्यालयातील दैनंदिन पेहराव कशा पद्धतीने असावा, या विषयी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.




  • मंत्रालयात आता जीन्स टी शर्ट आता घालता येणार नाही.

  • महिलांनाी साडी,सलवार चुडीदार,ट्राउझर पॅन्ट, त्यावर कुर्ता आवश्यकता असल्यास दुपट्टा असा पेहराव करावा. तर पुरुष कर्मचाऱ्यांनी शर्ट, पॅन्ट/ ट्राऊझर असा पेहराव करावा.

  • गडद रंगाचे चित्र विचित्र नक्षीकाम चित्र असलेले कपडे परिधान करू नये.

  • सरकारी कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांनी स्लीपर्स वापरू नये.

  • महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयामध्ये शक्यतो चपला, सॅन्डल, बूट यांचा वापर करावा तसेच पुरुष अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बूट, सॅन्डल याचा वापर करावा.

  • आठवड्यातील एक दिवस ( शुक्रवारी) सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी खादीचे कपडे परिधान करावे.

  • परिधान केलेला पेहराव स्वच्छ आणि नीटनेटका असावा


संबंधित बातम्या :

सरकारी कर्मचाऱ्यांनाही ड्रेस कोड, सरकारी कार्यालयात कोणते कपडे घालावे याबाबतचे निर्देश जाहीर