मुंबई : एमआयडीसी (महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ.)  865 पदांसाठी 20 ऑगस्ट पासून सुरू आहे. मात्र ही परीक्षा  दिल्ली आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाने काळ्या यादीत टाकलेल्या मेसर्स अ‍ॅपटेक लिमिटेड कंपनीकडून घेतली जात असल्याची बाब उघड झाली आहे.  राज्यातील विविध विभागांच्या सरळसेवा भरतीअंतर्गत होणाऱ्या सर्व परीक्षा या खासगी कंपन्यांकडून घेतल्या जाताय. महाआयटीने त्यासाठी 4 कंपन्यांची निवड 23 जानेवारी 2021 ला शासन निर्णय काढून केली होती.

Continues below advertisement


1. मेसर्स अॅपटेक लिमिटेड
2. मेसर्स जीए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी प्रयाव्हेट लिमिटेड
3. मेसर्स जींजर वेब्ज प्रायव्हेट लिमिटेड
4. मेसर्स मेटा-आय टेक्नॉलॉजी प्रायव्हेट या कंपन्यांची निवड केली होती 


त्यातील मेसर्स अँपटेक लिमिटेक ही कंपनी ब्लॅकलिस्ट मध्ये असल्याचा समोर येत आहेत. 


महाआयटी टेंडर मध्ये टेंडर प्रक्रियेत भाग घेणारी कंपनी देशात/राज्यात कोणत्याही ब्लॅक लिस्टमध्ये नसू नये अशा प्रकारचा अंडरटेकिंग घेण्यात आलं होतं. मात्र या कंपनीला उत्तर प्रदेश पॉवर कॉपोरेशन लिमिटेड द्वारे घेण्यात आलेल्या एका परीक्षा प्रक्रिय दरम्यान 7 ऑक्टोबर 2019 रोजी ब्लॅक लिस्टमध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने टाकले होते.


ब्लॅकलिस्ट मधून काढण्यासाठी आपटेक तर्फे फेब्रुवारी 2021 दिल्ली उच्च न्यायालयात याचिका  टाकण्यात आली होती. न्यायालयाचे आपटेक वरच 10 लाखाचा फाईन मारत, ब्लॅकलिस्ट कायम ठेऊन त्यांची याचिका रद्द केली.


एमआयडीसी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार 'ही सर्व प्रक्रिया राबविण्यासाठी राज्य सरकराच्या महाआयटीने शासन निर्णयानुसार निवड केलेल्या 4 कंपनीपैकी एका कंपनीला एमआयडीसी परीक्षेचे काम  द्यायचे होते. त्यानुआर आम्ही या कंपनीला हे काम दिले आणि एमआयडीसी ऑनलाइन परीक्षा व्यवस्थित पार पडली आहे.


संबंधित बातम्या :


परमबीर सिंह, अनिल देशमुख दोघांचीही चौकशी सुरु मात्र दोघेही गैरहजर; नेमके आहेत तरी कुठे?


शिवसेनेच्या खासदार भावना गवळींच्या अडचणीत वाढ, ईडीकडून चौकशी सुरु, किरीट सोमय्या म्हणाले...


Online Transaction : एक चूक आणि लाखोंचा फटका; ऑनलाईन व्यवहार करताना काय काळजी घ्यावी?