रत्नागिरी: चिपळूणमध्ये हायवेलगतची जी म्हाडाची जागा आहे त्या ठिकाणी अल्प आणि अत्यल्प अशा दोन प्रकारच्या सदनिका बांधल्या जातील असं राज्याचे मंत्री उदय सामंत म्हणाले. 28 कोटी रुपयाचं संकुल मंजूर केलेलं आहे त्याचं टेंडरदेखील आता सुरु होतंय आणि काही दिवसांमध्ये त्याचं कामही सुरू होणार असंही उदय सामंत म्हणाले.
नारायण राणेंच्या पत्रकार परिषदेवर बोलताना मंत्री उदय सामंत म्हणाले की, मला असे वाटते की खासदार विनायक राऊतांनी राणेंना उत्तर दिले आहे. आता कोणाला नोटीस कधी निघणार आहे हे त्यांना कळायला लागलं तर ती यंत्रणा कशा पद्धतीने काम करते हे मला नाही.
उदय सामंत पुढे म्हणाले की, कोणाचं घर पाडण्यासाठी किंवा कोणाच्या घराची चौकशी लावण्यासाठी मी फोन केला नाही. तसं असेल आणि ते सिद्ध झालं तर मी वाटेल ती किंमत मोजायला तयार आहे. मी असलं पाप करायला जात नाही. मी मैदानात निवडणुकीच्या वेळी उत्तर देणारा कार्यकर्ता आ. तरी कुणाचं घर किती मोठं आहे आणि कोणाचे घर किती छोटं आहे या बाबतीत मी कोणाकडे तक्रार केली नाही, कोणालाही पाठीशी घातले नाही.
उदय सामंत म्हणाले की, जर ऑनलाइन परीक्षेमध्ये कॉपी करण्याचे प्रमाण वाढत असेल आणि ते जर पुराव्यानिशी सिद्ध झाल्याच्या तक्रारी आल्या तर त्या विद्यार्थ्यांवर नक्की कारवाई केली जाईल. ऑनलाईन परीक्षा ही पद्धत विद्यार्थ्यांना सोपी वाटत असेल तर ते सोल्युशन नाही. ऑफलाइन देखील एक्झाम आम्हाला सुरू कराव्या लागतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही ऑनलाईन एक्झाम घेतलेल्या होत्या.
संबंधित बातम्या: