MHADA Exam Paper Leak : टीईटी परीक्षा घोटाळ्यासह  (TET Exam Scam) म्हाडा पेपर फुटीप्रकरणात पुणे सायबर पोलिसांकडून (Pune Cyber Police) आणखी तीन दलालांना अटक करण्यात आलीय. संबंधित दलालांनी उमेदवारांकडून कोट्यवधी रूपये उकळून वाटून घेतल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, या प्रकरणी आणखी आर्थिक गैरव्यवहार उघडकीस येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येतेय. 


विविध भागातून दलालांना अटक
नाशिक, बुलढाणा, लातूर परिसरात छापे मारून दलालांना अटक करण्यात आली असल्याचे समजते.  त्यामुळे टीईटीसह म्हाडा पेपर फुटीप्रकरणातील आणखीन आर्थिक गैरव्यवहार उघडकीस येणार असल्याची शक्यताव व्यक्त करण्यात येतेय. मुकुंदा जगन्नाथ सूर्यवंशी (वय 33, रा. नाशिक), कलीम गुलफेर खान (वय 52, रा. बुलढाणा), जमाल इब्राहिम पठाण (वय 40, रा. लातूर) अशी अटक केलेल्या दलालांची नावे आहेत. टीईटी 2018 मध्ये आरोपी मुकुंदा याने अपात्र उमेदवारांना पात्र करण्याचे आमिष दाखवून तब्बल 80 लाख रुपये एजंट हरकळ बंधूंना दिल्याचे सांगितले. त्याशिवाय 2019 च्या टीईटी  परीक्षेत 1 कोटींवर रक्कम पोहोच केल्याचे समजते. 


पुणे सायबर पोलीसांची कामगिरी



दरम्यान आरोग्य भरती पेपर फुटीतील पुणे सायबर पोलीसांना हवा असलेला आणखी एक म्होरक्या सायबर पोलीसांच्या हाती लागला होता. अतुल प्रभाकर राख असे गुरुवारी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अतुल राख हा याआधीच अटकेत असलेला आरोपी संजय सानप याचा मेहुणा आहे.  पेपरफुटी प्रकरणात पुणे सायबर पोलीसांना हवा असलेला मुख्य आरोपी जीवन सानप याची पेपरफुटी प्रकरणातील संबंधित सर्व कामे अतुल राख करायचा. अतुल राखला पोलिसांनी पुण्यातूनच अटक केली. आरोग्य भरतीतील गट ‘क’ आणि गट ‘ड’ या दोन्ही परीक्षांचे पेपर फुटले होते. या पेपरफुटीमुळे परीक्षार्थी उमेदवारांमध्ये मोठ्या प्रमाणावर संतापाची लाट उसळली होती. पुणे सायबर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत काही आरोपींना अटक केली असून काहींचा शोध सुरू आहे. आरोग्य भरतीच्या दोन्ही पेपरफुटीमध्ये पुणे सायबर पोलीसांना वडझरीचे सानप बंधू हवे आहेत. या प्रकरणात केवळ संजय शाहुराव सानप याला पोलिसांनी गजाआड केले आहे. 

 



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI