चंद्रपूर : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. सचिनने पोस्ट केलेला व्हिडीओ क्रिकेटचा नसून ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील आहे.
सलग दोन वर्षांपासून सचिन ताडोबाला जात आहे आणि यावर्षी 24 ते 27 जानेवारी दरम्यान चार दिवस ताडोबा येथे मुक्कामी होता. या दरम्यान घेतलेल्या अनुभवाचा व्हिडिओ त्याने आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. 4 मिनिट 42 सेकंदांचा हा व्हिडीओ आहे. ज्यात सफारी करताना झालेले वाघांचे दर्शन आणि या अनुभवाचे वर्णन करताना सचिन दिसत आहे.
सचिन आपल्या व्हिडीओमध्ये म्हणाला, ताडोबाला भेट देऊन मला फार आनंद झाला. आज सकाळी आम्हाला वाघीण आणि चार बछडे पाहायला मिळाले. ते जवळपास 45 मिनिटे आमच्या समोर खेळत होते. अशा प्रकारचे अनुभव फार कमी मिळतात. अभयारण्याचे देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे ही गोष्ट शक्य झाली आहे. ताडोबाला मला पुन्हा यायला आवडेल.
ताडोबातील मुक्कामादरम्यान सचिनने बफरमधील अलीझंझा, मदनापूर आणि बेलारामध्ये तर कोरमधील कोलारा गेटमधून सफारी केली होती. ताडोबासाठी काम करणाऱ्या सर्वांचे आभार सचिनने मानले.
संबंधित बातम्या :