मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने फेसबूकवर शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. मुंबईकर सचिन मुंबई रस्ता चुकला सांगितलं तर खरं वाटणार नाही. पण स्वत: सचिनने याची कबुली दिली. नुसती कबुली नाही तर नेमकं काय घडलं या सगळ्या प्रसंगाचा व्हिडीओच शूट केला आहे. एकेदिवशी सचिन मुंबईत रस्ता चुकला होता. त्यावेळी त्याला मुंबईतील एका मराठी रिक्षा चालकाने कशी मदत केली, असा सगळा प्रसंग सचिनने व्हिडीओच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
मी सध्या कांदिवली पूर्व येथे आहे. मात्र तुम्ही विश्वास ठेवणार नाही, मी रस्ता चुकलोय. येथील वनवे आणि रहदारीमुळे मी रस्ता चुकलोल, असं खुद्द सचिनने आपल्या व्हिडीओत सांगितलं. त्यावेळी मंगेश फडतरे नावाच्या रिक्षा चालकाने ' मला फॉलो करा, मी तुम्हाला हायवेपर्यंत पोहोचवतो' असं म्हणत सचिनला योग्य रस्त्याची माहिती दिली.
रिक्षा चालकाने रस्ता दाखवला नसता तर मी हायवे पर्यंत पोहोचलोच नसतो, असंही सचिनने म्हटलं. सचिनने रिक्षा चालकाचे हात मिळवून आभारही मानले. हात मिळवला कारण हा व्हिडीओ जानेवारी 2020 मधील असून सचिनने आता हा व्हिडीओ शेअर केला आहे. सचिन तेंडुलकर आपल्या समोर आहे म्हटल्यावर रिक्षा चालकाने सचिनसोबत सेल्फी काढण्याची संधीही सोडली नाही. असा सचिनचा मुंबईतील रस्त्यावर हरवल्याचा किस्सा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
इतर बातम्या
सचिन तेंडुलकर शोधतोय त्याची 'ही' गोष्ट; फॅन्सलाही केलं मदतीचं आवाहन