Market Committee Election Live Updates : बाजार समित्यांच्या निवडणुकांसाठी उद्या मतदान, सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला

Market Committee : कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांची (Market Committee Election) रणधुमाळी सुरु आहे. या निवडणुकांसाठी उद्या मतदान होणार आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 27 Apr 2023 01:20 PM
धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना मतदान साहित्याचे वाटप

Market Committee Election :  धुळे जिल्ह्यातील चारही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडीच्या पॅनल मध्ये लढत होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे चारही बाजार समितीच्या 68 जागांसाठी तब्बल 156 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून उद्या होणाऱ्या धुळे आणि दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर तयारी पूर्ण करण्यात आली आहे, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज कर्मचाऱ्यांना मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले

धुळे जिल्ह्यातील चार कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी उद्या मतदान, भाजप विरुद्ध मविआमध्ये सामना

Market Committee Election :  धुळे जिल्ह्यातील चारही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडीच्या पॅनलमध्ये लढत होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. चारही बाजार समितीच्या 68 जागांसाठी तब्बल 156 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून उद्या होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर तयारी पूर्ण करण्यात आली आहे. दोंडाईचा आणि धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रत्येकी दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतून 252 उमेदवारांनी माघार घेतली असून उर्वरित 16 जागांसाठी 39 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर साक्री कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी 41 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत जय किसान आणि परिवर्तन पॅनल मध्ये लढत होणार आहे. या ठिकाणी आमदार जयकुमार रावल आणि माजी मंत्री हेमंत देशमुख यांच्यात मुख्य लढत असून शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत 19 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. या ठिकाणी 18 जागांसाठी 42 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार अमरीश पटेल यांचे वर्चस्व कायम असल्याने त्यांनी 18 जागांवर 15 नवीन उमेदवार दिले असून उर्वरित तीन उमेदवारांना अमरीश पटेल यांनी पाठिंबा दिला आहे, एकंदरीत जिल्ह्यातील चारही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या लढतींकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असून आगामी निवडणुकांची या बाजार समितीच्या निवडणुका नांदी ठरणार असून राज्यात झालेल्या सत्तांतराच्या नंतर प्रथमच बाजार समितीचे निवडणूक होत आहेत यामुळे कोणत्या पक्षाच्या पॅनलला किती जागा मिळतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे..

कृषी उत्पन्न  बाजार समितीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या, भंडारा जिल्ह्यातील चार बाजार समितीसाठी उद्या मतदान

Market Committee Election :   भंडारा जिल्ह्यात कृषी उत्पन्न  बाजार समितीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रफुल्ल पटेल, परीणय फुके यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती आहे तर काँग्रेसची एकला चलोची भुमिका आहे. शेतकरी विकास पॅनेल आणि शेतकरी परीवर्तन पॅनेल आमने-सामने आहेत. भंडारा जिल्ह्यातील चार कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी 28 एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. आज या निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजपाने अभद्र युती करीत काँग्रेसला एकटे पाडले आहे. त्यामुळं काँग्रेसनं नाना पटोले यांच्या नेतृत्वात एकला चलोची भुमिका घेतली आहे. 

बीड जिल्ह्यातील 6 बाजार समितीसाठी उद्या मतदान

Market Committee Election : बीड जिल्ह्यातील 9 बाजार समितीसाठी होणारी निवडणूक अंतिम टप्प्यात आली असून जिल्ह्यातील 6 बाजार समितीसाठी उद्या मतदान होणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक बाजार समितीच्या 18 जागांसाठी निवडणूक होत असून या निवडणुकीमध्ये भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे या निवडणुकीमध्ये आठ बाजार समित्यासाठी उद्या मतदान होणार असून दोन बाजार समितीचे मतदान 30 एप्रिल रोजी होणार आहे.

पार्श्वभूमी

Market Committee Election Live Updates : ग्रामीण राजकारणाचे केंद्र समजल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांची (Market Committee Election) रणधुमाळी सुरु आहे. बाजार समित्यांसाठी उद्या (28 एप्रिल) मतदान होणार आहे. या या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत.  


दरम्यान, कुठे बाजार समितीची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे तर कुठे निवडणुकीची चुरस पाहायला मिळत आहे. बऱ्याच ठिकाणी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप आणि शिवसेना शिंदे गट असा समना होत आहे. त्यामुळं राज्यात अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती होत आहेत. राज्यातील 257  कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूक लागली आहे. यामधील काही बाजार समितीत्या बिनविरोध देखील झाल्या आहेत. बाजार समित्यांसाठी येत्या 28 एप्रिलला मतदान होणार आहे. तर 30 एप्रिलला मतमोजणी पार पडणार आहे. त्यामुळं ग्रामीण भागात कोणत्या पक्षाचं वर्चस्व आहे हे आपल्याला 30 एप्रिललाचं समजणार आहे. 


राजकीय नेत्यांचे ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप


स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी आणि शिवसेना-भाजप अशी लढती होणार आहेत. तर काही ठिकाणी काही पक्ष स्वतंत्र ताकद अजमावणार असल्याचे सध्याचे चित्र आहे. दरम्यान, या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मतदारांना आपलेसे करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष प्रयत्न करताना दिसत आहेत. प्रचाराच्या सभा, संपर्क मोहीम यासह सर्व पद्धतीने प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न दोन्ही पॅनलकडून सुरु आहे. तसेच या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप देखील करत आहे.


 जळगाव बाजार समितीची निवडणूक रद्द करण्याची मागणी


जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत कामगाराच्या बोगस मतदार याद्या करण्यात आल्याचा आरोप कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे. बोगस मतदार याद्यांच्या पार्श्वभूमीवर जळगाव बाजार समितीची निवडणूक रद्द करण्याची निवडणूक आयोगांकडं  मागणी करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यात बाजार समितींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु असून राजकारण चांगलेच तापले आहे. या निवडणुकांमध्ये बोगस मतदारांची यादी तयार करण्यात आल्याचा धक्कादायक आरोप कामगार संघटनेच्या नेत्यांनी केला आहे. बोगस मतदारांच्या माध्यमातून निवडणूक पार पाडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा बाजार समितीच्या कामगार संघटनेच्या अध्यक्षांनी केला आहे. 


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.