Doctor strike: राज्यभरातल्या रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टरांनी 2 जानेवारीपासून संपावर जाण्याचा राज्य सरकारला इशारा दिला आहे. सेन्ट्रल मार्डकडून वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना पत्र देखील देण्यात आले आहे. 


 महाराष्ट्रातील मार्ड या निवासी डॉक्टरांच्या संघटनेचा संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.  विविध मागण्यांसाठी मागील एका वर्षापासून मंत्र्यांसोबतच इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठका होऊनही प्रतिसाद न दिल्याने  संपाचे हत्यार उगारले आहे. अधिवेशन काळात मागण्या मान्य न झाल्यास संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.  निवासी डॉक्टर संपावर गेल्यास आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढणार आहे. 


काय आहेत निवासी डाॅक्टरांच्या मागण्या? 


1. वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या 1 हजार 432 जागांची पदनिर्मिती. शासनाकडे हा प्रस्ताव रखडत पडलाय 
2. शासकीय आणि महाविद्यालयात अपुऱ्या आणि मोडकळीस आलेल्या वसतीगृहामुळे होणारी विद्यार्थ्यांची हेळसांड 
3. सहयोगी आणि सहाय्यक प्राध्यपकांची अपुरे पदे तातडीने भरणे 
4. महागाई भत्ता तात्काळ देण्यात यावा 
5. वरीष्ठ निवासी डॉक्टरांच्या वेतनातील तफावत दूर करत सर्व निवासी डॉक्टरांना समान वेतन लागू करणे


 राज्यातील मार्डच्या निवासी डॉक्टरांनी 2 जानेवारीपासून संपाची घोषणा केली आहे. राज्य सरकारने विविध मागण्यांची पूर्तता न केल्याने मार्डचा संपाचा निर्धार केला आहे. डॉक्टरांची संख्या कमी आहे, अशातच उपलब्ध डॉक्टरांवर अधिक ताण येतोय. त्यामुळे रोष व्यक्त करण्यासाठी आणि प्रकरणाचं गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी संपावर जात असल्याचं डॉक्टरांनी म्हटलंय.