Marathwada Farmers : मराठवाड्यात शेतकऱ्यांची (Marathwada Farmers Crisis) ससेहोलपट सुरुच आहे. महाराष्ट्रातील एकट्या मराठवाडा विभागात आठ जिल्ह्यातील 267 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांची भीषण अवस्था समोर आली आहे. मराठवाडा विभागात सर्वाधिक आत्महत्या बीड जिल्ह्यात झाल्या आहेत.  


बीड जिल्ह्यात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या 


मराठवाड्यात गेल्या चार महिन्यात 267 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून सर्वाधिक आत्महत्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आहेत. बीडमध्ये 59 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यानंतर छत्रपती संभाजी नगरचा नंबर असून 44 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे निसर्गाच्या दृष्टचक्रात सापडलेल्या शेतकऱ्यांची वाताहत सुरु असल्याचे चित्र आहे.


गेल्या चार महिन्यात झालेल्या आत्महत्या



  • जालना 29

  • परभणी 12

  • हिंगोली 13 

  • नांदेड 41

  • बीड 59

  • लातूर 27

  • धाराशिव 42 

  • एकूण 267


2023 मध्येही 1,088 शेतकऱ्यांच्या आत्महत्या


गेल्या चार महिन्यांत 267 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या असतानाच 2023 मध्ये मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये तब्बल 1,088 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या अहवालातून समोर आले होते. 2022 च्या तुलनेत हा आकडा 65 ने वाढला होता.


2023 मध्ये झालेल्या 1,088 आत्महत्यांपैकी बीडमध्येच सर्वाधिक 269 आत्महत्या झाल्या होत्या. छत्रपती संभाजीनगरमध्ये 182, नांदेडमध्ये 175, धाराशिवमध्ये 171 आणि परभणीमध्ये 103 आत्महत्या झाल्या, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. जालना, लातूर आणि हिंगोली येथे अनुक्रमे 74, 72 आणि 42 मृत्यूची नोंद झाली आहे. मराठवाड्यात 2022 मध्ये सुद्धा 1,023 शेतकरी आत्महत्या झाल्या. ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, धाराशिव, लातूर, नांदेड आणि परभणी जिल्ह्यांचा समावेश आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या