एक्स्प्लोर

बंगलोरमध्ये 'ओळख मायबोली'ची ऑनलाईन मराठी शाळा; जगभरातून विद्यार्थ्यांचा सहभाग, उपक्रमाचं होतंय कौतुक 

कोरोनाच्या महामारीनं ऑनलाईन शाळा हा पर्याय जगाला मिळाला आणि मराठी प्रतिष्ठान बंगळुरुने त्याचा उपयोग मायबोली संवर्धनासाठी करायचा ठरवले आणि त्यातूनच "ओळख मायबोलीची " या संकल्पनेचा जन्म झाला.  

Marathi Mayboli News: महाराष्ट्र प्रतिष्ठान बंगलोरमध्ये आयोजित ओळख मायबोलीचे या ऑनलाईन मराठी शाळेच्या पाचव्या पर्वाचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले.   प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्ष माणिक पटवर्धन उपस्थित होत्या. कोरोनाच्या महामारीनं ऑनलाईन शाळा हा पर्याय जगाला मिळाला आणि मराठी प्रतिष्ठान बंगळुरुने त्याचा उपयोग मायबोली संवर्धनासाठी करायचा ठरवले आणि त्यातूनच "ओळख मायबोलीची " या संकल्पनेचा जन्म झाला.  

सोशल मिडीयाचा उपयोग करून 'शाळा सुरू करत आहोत.' असा मेसेज पोस्ट केल्यानंतर तिथून या उपक्रमाला प्रतिसाद मिळाला. शिक्षक आणि विद्यार्थी दोन्हींचा उत्तम प्रतिसाद या शाळेला मिळतोय.  शिक्षक म्हणून ज्यांनी होकार दर्शविला, ते पेशाने शिक्षक नव्हते तर हौसेने शिकवायला तयार होते. 

शिक्षकांनी वारंवार मिटिंग घेऊन अभ्यासक्रम तयार केला. लॉकडाऊन असल्याने हाती असलेल्या साहित्यातून शिकवायचे होते. सगळ्या दृष्टीने विचार करून, गुरुपौर्णिमेचा मुहूर्त साधून 5 जुलै 2020 ला "ओळख मायबोलीची" ही ऑनलाईन मराठी शाळा सुरू झाली. पहिल्या पर्वात जपान आणि अमेरिकेतून विद्यार्थी दाखल झालेले पाहून आपल्या भाषेची ओढ काय असते, याची जाणीव उपक्रम सुरु करणाऱ्या आयोजकांना झाली. 

तीन महिने शाळा चालवून बघू असा विचार करणारे आयोजक आणि शिक्षक शाळा सुरूच ठेवू या निर्णयापर्यंत येऊन पोहोचले आहेत. या अनोख्या शाळेत भाषेबरोबरच आपले सणवार, संस्कृती, गाणी गोष्टी, श्लोक यामध्ये मुलं रमत आहेत.  महाराष्ट्र दिन, मराठी भाषा गौरव दिन, पंढरीची वारी, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी असे सण आणि दिवस या माध्यमातून ऑनलाईन साजरे केले जात आहेत. 

दरम्यान बृहन्महाराष्ट्र मंडळ नवी दिल्ली आणि राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने  दरवर्षी 2 ऑक्टोबर रोजी घेतल्या जाणाऱ्या मराठी निबंध स्पर्धा आणि मराठी भाषा, संस्कृती ज्ञान परीक्षा या जागतिक पातळीवर घेतल्या जातात. याचं  ऑक्टोबर 2021 पासून मराठी प्रतिष्ठान बंगळुरु मधील केंद्र सुरू झाले. या परीक्षांमधून दरवर्षी अनेक विद्यार्थ्यांना पुरस्कारांनी सन्मानीत केलं जाते.  या परीक्षेमुळे "सुलभ भारती" ही महाराष्ट्र शासनाची पुस्तकं मुलांना समजली.

ही शाळा निःशुल्क असल्याने पुस्तकं पालकांना घ्यायला सांगायची असे ठरले. पण बंगळुरूमध्ये मराठी पुस्तके ती सुद्धा शासनाची मिळणे अशक्यच होते. त्यामुळे पुस्तके पुण्याहून मागवून ती उद्घाटनदिवशी सशुल्क द्यायची असे ठरले. पण चांगल्या उपक्रमात आपलाही सहभाग असावा म्हणून श्रीधर धावड यांनी सगळी पुस्तके त्यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना भेट दिली. 
 
शाळा ऑनलाईन असल्याने शिक्षक आणि विद्यार्थी यांची प्रत्यक्ष भेट झालीच नव्हती. यावेळी पाचव्या पर्वाच्या निमित्ताने सगळे एकत्र जमले होते. आजपर्यंत जवळ जवळ 450 मुलांनी ह्या शाळेचा लाभ घेतला आहे. बंगळुरुमधील मुलांबरोबरच पुणे, हैदराबाद, जपान, सौदी, स्पेन, लंडन आणि अमेरिकेतून मुले या शाळेत सहभागी झाली आहेत. मराठी भाषा शिकण्यासाठी बंगळुरुमधून सुरु असलेल्या या अनोख्या उपक्रमाचं सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Farmers Loan Waiver: मोठी बातमी! प्राप्तिकर भरणारे 94 हजार शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र; राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात 'या' दिवशी जमा होणार पैसे
मोठी बातमी! प्राप्तिकर भरणारे 94 हजार शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र; राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात 'या' दिवशी जमा होणार पैसे
Maharashtra Live Breaking Marathi News: नाशिक शहरात खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू
Maharashtra Live Breaking Marathi News: नाशिक शहरात खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू
Mumbai Rain Water: एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
Pankaja Munde : मंत्री पंकजा मुंडेंचं राजकीय निवृत्तीबाबत मोठं वक्तव्य; म्हणाल्या, 'जसा समृद्धी हायवेवर एक्झिट असतो तसाच....
'जसा समृद्धी हायवेवर एक्झिट असतो तसा माझ्या राजकारणातही वेळोवेळी एक्झिट असेल'; मंत्री पंकजा मुंडेंचं राजकीय निवृत्तीबाबत मोठं वक्तव्य

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SRA Fraud Mumbai: मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Mumbai Rain Water: एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Embed widget