एक्स्प्लोर

मराठा विद्यार्थ्यांना 'एसईबीसी' पर्याय खुला, जागांचा प्रश्न कायम

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परिपत्रक जाहीर करून तशी तरतूद एमपीएससीच्या अधिकृत पोर्टलवर केली आहे. आता मराठा विद्यार्थ्यांना 'एसईबीसी' पर्याय खुला झाला असला तरी अद्याप आठ टक्के जागांचा प्रश्न मात्र कायम आहे.

बीड : मेगा भरतीमध्ये मराठा आरक्षणाचा फायदा उमेदवारांना होणार असे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र नुकत्याच जाहिर झालेल्या 342 जागांसाठीच्या भरतीत एसईबीसीसाठी पर्यायच नसल्याने मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आरक्षणाचा फायदा मिळणार कसा? असा प्रश्न उपस्थित झाला होता. यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आरक्षणाचा लाभ घेता येत नसल्याचे वृत्त एबीपी माझाने समोर आणल्यानंतर एमपीएससीला जाग आली आहे. आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परिपत्रक जाहीर करून तशी तरतूद एमपीएससीच्या अधिकृत पोर्टलवर केली आहे. आता मराठा विद्यार्थ्यांना 'एसईबीसी' पर्याय खुला झाला असला तरी अद्याप आठ टक्के जागांचा प्रश्न मात्र कायम आहे. 342 जागांसाठीच्या भरतीच्या जाहिरातीतील विविध पदांसाठी आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी जी माहिती अपलोड करायची आहे, ती माहिती भरली जात नसल्याने मराठा समाजातील विद्यार्थी बुचकळ्यात पडले होते. मोठ्या प्रतिक्षेनंतर एमपीएससीने 342 जागांसाठी जाहिरात काढली. ही जाहिरात प्रकाशित होऊन सहा दिवस झाले आहेत. मात्र मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आरक्षणाच्या कोट्यातून फॉर्म भरण्याची व्यवस्थाच नव्हती. एमपीएससीच्या साईटवर अद्याप सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गासाठीची माहिती भरता येत नव्हती. यात आता एमपीएससीने सुधारणा केल्या आहेत. 16 टक्के आरक्षण असतानाही आठ टक्केच फायदा? नोकरी भरतीच्या जाहिरातीनंतर अनेक विद्यार्थी आता फॉर्म भरण्यासाठी गर्दी करत आहेत. या भरतीचा फॉर्म भरण्यासाठी इतर समाजातील मुलांसाठी त्यांच्या वेगळ्या प्रवर्गाची सोय या साईटवर करण्यात आली होती. मात्र मराठा समाजातील मुलांना साईटवर आपला प्रवर्ग बदलता येत नव्हता. याची माहिती घेण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी आयोगाकडे तक्रारी केल्या होत्या. त्यांना ई-मेलही केले होते. यात आता एमपीएससीने सुधारणा केल्या आहेत. मात्र मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण असतानाही या जाहिरातीवर नजर टाकल्यावर आठ टक्के इतकाच फायदा मराठा समाजातील मुलांना होणार आहे असे दिसते. एमपीएससी भरतीत मराठा समाजासाठी राखीव जागा पद                                               एकूण जागा                  एसईबीसी उपजिल्हाधिकारी                                    40                         04 पोलीस उप अधीक्षक                             34                         03 सहायक पोलीस आयुक्त सहायक संचालक                                   16                         01 (वित्त व लेखा सेवा) तहसीलदार                                            77                         06 उप शिक्षणाधिकारी                                25                         02 (राज्य शिक्षण सेवा) कक्ष अधिकारी                                      16                         01 सहायक गट विकास अधिकारी              11                         01 नायब तहसीलदार                                 113                       08

महत्त्वाच्या बातम्या

Nepal Floods Marathi News: ज्याची भीती होती, तेच झालं...नेपाळमध्ये 392 जणांचा मृत्यू, 1500 हून अधिक बेपत्ता; महाराष्ट्रातील 114 नागरिक अडकले
ज्याची भीती होती, तेच झालं...नेपाळमध्ये 392 जणांचा मृत्यू, 1500 हून अधिक बेपत्ता; महाराष्ट्रातील 114 नागरिक अडकले
Maharashtra Live News Updates: प्रताप सरनाईकांचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी फिरवला; रिक्षाचालकांना मराठी शिकण्यासाठी एक वर्षांची मुदतवाढ
Maharashtra Live News Updates: प्रताप सरनाईकांचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी फिरवला; रिक्षाचालकांना मराठी शिकण्यासाठी एक वर्षांची मुदतवाढ
Nepal: नेपाळमध्ये महापुराचा हाहाकार! महाप्रलयात 389 लोकांचा मृत्यू, महाराष्ट्रातील 114 नागरिक अडकल्याची माहिती, पूरग्रस्तांसाठी केंद्र-राज्य सरकारसह शिवसेनेचाही मदतीचा हात
नेपाळमध्ये महापुराचा हाहाकार! महाप्रलयात आत्तापर्यंत 389 लोकांचा मृत्यू, महाराष्ट्रातील 114 नागरिक अडकल्याची माहिती, पूरग्रस्तांसाठी केंद्र-राज्य सरकारसह शिवसेनेचाही मदतीचा हात
Latur Crime News: 4 लाखांच्या कर्जासाठी 10 लाखांहून अधिक व्याज दिले, तरीही त्रास; खाजगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून पिग्मी एजंटने जीवन संपवलं, लातूरमधील घटना
4 लाखांच्या कर्जासाठी 10 लाखांहून अधिक व्याज दिले, तरीही त्रास; खाजगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून पिग्मी एजंटने जीवन संपवलं

व्हिडीओ

Amit Thackeray on Ameet Satam : अमित साटमांना भुंकायला ठेवलंय,अमित ठाकरेंची जहरी टीका
Narhari Zirwal On Adivasi Students Protest: खाऊन पिऊन आंदोलन करा, मी जे आंदोलन करायचो ते चोरून खायचं
Rohit Pawar & Rahul Gandhi Meet : रोहित आणि राहुल कशाची चाहूल? | ABP Majha Special Report
MPSC Paper Leak Case : MPSC पेपरफुटीची भन्नाट लव्हस्टोरी Special Report
Laxman Hake On OBC Andolan : ओबीसींच्या आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन, सुरुवात कुठून? हाकेंनी सांगितलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Toxic Box office collection: बॉक्स ऑफिसवर आलं ' Toxic' चं वादळ; ओपनिंग 100 कोटीने पण दुसऱ्याच दिवशी...; यशाच्या सिनेमानं दोन दिवसात किती कमावले?
बॉक्स ऑफिसवर आलं ' Toxic' चं वादळ; ओपनिंग 100 कोटीने पण दुसऱ्याच दिवशी...; यशाच्या सिनेमानं दोन दिवसात किती कमावले?
No Sugar Challenge : 1 महिना साखर खाणे बंद केल्यास शरीरात काय बदल होतात? जाणून घ्या थक्क करणारे फायदे
1 महिना साखर खाणे बंद केल्यास शरीरात काय बदल होतात? जाणून घ्या थक्क करणारे फायदे
Disha Salian : दिशा सालियन मृत्यू प्रकरणी हायकोर्टाचे मुंबई पोलिसांना खडेबोल; तपासाला मर्यादा, FIR का दाखल केला नाही? न्यायालयाचा प्रश्न
दिशा सालियन मृत्यू प्रकरणी हायकोर्टाचे मुंबई पोलिसांना खडेबोल; तपासाला मर्यादा, FIR का दाखल केला नाही? न्यायालयाचा प्रश्न
'औषध निरीक्षक'नंतर आता MPSC एक्साईज पेपरचा 'मार्किंग पॅटर्न' फुटला, रोहित पवारांचा मोठा आरोप; 'सहसचिवा'ची भूमिका संशयास्पद?
'औषध निरीक्षक'नंतर आता MPSC एक्साईज पेपरचा 'मार्किंग पॅटर्न' फुटला, रोहित पवारांचा मोठा आरोप; 'सहसचिवा'ची भूमिका संशयास्पद?
Nepal Flash Flood: नेपाळ महाप्रलयात 8 जिल्ह्यात 289 मृतदेह सापडले, तब्बल 288 भारतीय बेपत्ता, तिबेटमध्येही 200 जण अडकले; 1500 जणांचा थांगपत्ता लागेना
नेपाळ महाप्रलयात 8 जिल्ह्यात 289 मृतदेह सापडले, तब्बल 288 भारतीय बेपत्ता, तिबेटमध्येही 200 जण अडकले; 1500 जणांचा थांगपत्ता लागेना
Laxman Hake : सुप्रिया सुळेंचं माहिती नाही; पण रोहित पवारांचा मात्र ओबीसीचा दाखला, लक्ष्मण हाकेंचा दावा, बड्या नेत्यांची नावं घेऊन म्हणाले यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र
सुप्रिया सुळेंचं माहिती नाही; पण रोहित पवारांचा मात्र ओबीसीचा दाखला, लक्ष्मण हाकेंचा दावा, बड्या नेत्यांची नावं घेऊन म्हणाले यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र
Sonal Dinusha: पाचव्या नंबरवर येणाऱ्या 25 वर्षीय सोनल दिनुषाने टीम इंडियाची पाचही बोटं तोंडात घातली; भारताविरुद्ध गेल्या 66 वर्षात कोणालाच जमला नाही तो भीमपराक्रम सुद्धा केला!
पाचव्या नंबरवर येणाऱ्या 25 वर्षीय सोनल दिनुषाने टीम इंडियाची पाचही बोटं तोंडात घातली; भारताविरुद्ध गेल्या 66 वर्षात कोणालाच जमला नाही तो भीमपराक्रम सुद्धा केला!
Supriya Sule: ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा धादांत खोटा; माहिती नेमकी कोणी दिली? पुरावा सादर करावा, अन्यथा..., वडेट्टीवारांनी केलेल्या आरोपांवर सुळेंचा इशारा
ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा धादांत खोटा; माहिती नेमकी कोणी दिली? पुरावा सादर करावा, अन्यथा..., वडेट्टीवारांनी केलेल्या आरोपांवर सुळेंचा इशारा
Embed widget