मुंबई: आधी दिलेलं मराठा आरक्षण (Maratha Reservation) ठाकरे सरकारला का टिकवता आलं नाही? दोन वर्षे शांत बसल्यानंतर हे वादळ अचानक का उठलं? असा प्रश्न राज्याचे मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांना विचारला. त्यावर मनोज जरांगे यांनीही प्रत्युत्तर दिलं. गोरगरीब मराठ्यांच्या जीवावर पैसे कमावलात, तुमच्या पैशाची मस्ती तुमच्याकडेच ठेवायची. आमचं आंदोलन शांततेत सुरू असून त्यांना कुठलं वादळ दिसलं असा सवालही जरांगे यांनी विचारला. 


मराठा आरक्षण कधी मिळेल हे सांगायला मी पंचांग घेऊन बसलो नाही असं वक्तव्य मंत्री तानाजी सावंतांनी केलं होतं. मराठा आरक्षणाचं वादळ अचानक का उठलं असा सवाल तानाजी सावंतांनी विचारला. तानाजी सावंतांच्या या वक्तव्यावर मनोज जरांगे पाटील यांनी पलटवार केला. तानाजी सावंतांना पैशाची मस्ती आली आहे. त्या जीवावर ते बोलत आहेत असं जरांगे म्हणाले. 


काय म्हणाले तानाजी सावंत? (Tanaji Sawant on Maratha Reservation)


जर तरच्या भूमिकांवर सांगायला मी काही पंचांग घेऊन बसलो नाही. शासनाला तुम्ही वेठीस धरणार आणि आरक्षण आताच द्या, आता कागदावर लिहून द्या अशी मागणी करणार. जे काही लिहून द्याल ते कायद्याच्या चौकटीत तरी टिकलं पाहिजे. 


आता आंदोलन का करताय? पहिला आरक्षण मिळालं ते नंतर रद्द झालं. फडणवीस मुख्यमंत्री असताना ते उच्च न्यायालयात टिकलं, पण ठाकरे सरकार असताना ते सर्वोच्च न्यायालयात टिकलं नाही. टिकलेले आरक्षण का गेलं? ठाकरेंना ते का टिकवता आलं नाही? ते रद्द झाल्यानंतर दोन वर्षे कुणीच काय बोललं नाही. आता अचानक जसं वादळ यावं अशा पद्धतीने चाललं आहे. 


मनोज जरांगेंचा पलटवार (Manoj Jarange Reply To Tanaji Sawant) 


तानाजी सावंतांच्या या प्रश्नावर मनोज जरांगे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, टिकणारं आरक्षण द्यायचं तर ते सरकारला कळतंय ना. तुम्ही ज्ञान पाजळू नका. मराठ्यांना आरक्षण कसं द्यायचं हे सरकारने ठरवावं, ते घ्यायचं का नाही ते मराठ्यांना आता कळतंय. 


त्यांना आता काय वादळ दिसलं हे माहिती नाही. उगाच शायनिंग कशाला दाखवायचं? तानाजी सावंत यांच्याकडे भरपूर पैसा आहे. गोरगरीब मराठ्यांच्या जीवावर त्यांनी पैसे कमावला. आता त्याच पैशाची त्यांना मस्ती आली आहे. ही 
पैशाची मस्ती तुमच्याकडेच ठेवायची. 


ही बातमी वाचा: 



VIDEO : Tanaji Sawant Vs Manoj Jarange : सावंतांचा जरांगेंवर वार, जरांगे म्हणतात सावंतांनी ज्ञान पाजळू नये