मुंबई राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation)  मुद्दा चांगलाच तापला आहे. मराठा आरक्षण देणं केंद्रांच्या हातात आहे. पंतप्रधान मोदींनी (PM Modi)  फोनवरुन मनोज जरांगेंशी (Manoj Jarange) संवाद साधायला हवा. उपमुख्यमंत्री दिल्लीला जरी असले तरी ते जरांगे पाटलांसाठी नाही तर आमदारांच्या खुर्च्या वाचवण्यासाठी जातात, अशी टीका खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut)  केला आहे.


संजय राऊत म्हणाले, मराठा आरक्षण हे केंद्र सरकारच्याच हातात आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रचारांमध्ये व्यस्त आहेत. अमित शहा मिझोराममध्ये फिरत आहेत. महाराष्ट्र पेटलेला आहे. जरांगे पाटलांचा जीवाचा बरं वाईट झालं तर हा महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही. प्रधानमंत्रीवरून बोललं पाहिजे उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितला पाहिजे. उपमुख्यमंत्री दिल्लीला जरी असले तरी ते जरांगे पाटलांसाठी नाही तर त्यांच्या कामासाठी जातात. आमदारांच्या खुर्च्या वाचवण्यासाठी  दिल्ली दौरे करत आहे. विधानसभा अध्यक्षांना काय सूचना द्यायच्या त्याच्यासाठी ते दिल्लीला थांबले आहेत. 


ठाण्याच्या लुईस वाडी भागात औट घटकेचे व्हीआयपी राहतात


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहत (CM Eknath Shinde) असलेल्या लुईस वाडी भागात पोलीस बंदोबस्त वाढवला शिवाय या भागातील रस्ताही बंद करण्याची अधिसूचना काढली. सर्वसामान्य जनतेचा रस्ता अडविण्याचा अधिकार आम्हाला मुळीच नाही.सोशल मीडिया आणि विरोधकांकडून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. या प्रकरणी रात्री उशिरा खासदार शिंदे यांनी सर्वसामान्य जनतेचा रस्ता अडविण्याचा अधिकार आम्हाला मुळीच नाही. ते व्हीआयपी कल्चर आम्हाला मुळीच मान्य नाही, असे म्हणत आपली भूमिका स्पष्ट केली. यावर संजय राऊत म्हणाले. औट घटकेचे ते व्हीआयपी त्या ठिकाणी राहतात. त्यांच्यासाठी अशा प्रकारचे जर निर्देश काढले असतील तर पोलिसांची ही चाटुगिरी आहे. पोलीस चाटुगिरी करत असल्याचे स्पष्ट दिसून येतं. महाराष्ट्रात हिंसाचार आहे तर आहेत बलात्कार आहेत भ्रष्टाचार आहेत तिथे पोलिसांनी लक्ष दिले पाहिजे


इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांच्या मागण्या मान्य करा


सरकारचे शिष्टमंडळ जरांगेंकडे जाऊन काय करणार आहे?  काही ठोस पर्याय निघणार आहे का? जरांगे पाटलांचा विषय संपवायला सरकारला अजून किती वेळ हवा आहे. सरकारने त्यांच्यासोबत चर्चा करावी आणि आमची भूमिका स्पष्ट आहे कोणाच्याही इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्याच्या समाजाच्या मागणी मान्य करावी, असे संजय राऊत म्हणाले.