एक्स्प्लोर
Advertisement
मराठा आरक्षणः आता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींकडून सुनावणी
मुंबईः सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्यावतीने हायकोर्टात पुन्हा मराठा आरक्षणासंदर्भात नवीन याचिका दाखल करण्यात आली. मात्र न्या. कानडे यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. विनोद पाटील उद्या मुख्य न्यायमूर्तींकडे धाव घेणार आहेत.
मराठा समाजातील लाखो विद्यार्थ्यांचा प्रश्न असल्यामुळे सुनावणी घेण्याचा आग्रह विनोद पाटील यांनी केला. महाराष्ट्रात लाखोंच्या गर्दीने मराठा समाजाचे मोर्चे निघत आहेत. मराठा तरूणांवर अन्याय होत असल्याची भावना आहे. अशा वेळी मराठा आरक्षणावरील सुनावणी जलदगतीने व्हावी, यासाठी विनोद पाटील पुन्हा गुरूवारी हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीकडे धाव घेणार आहेत.
हायकोर्ट सहानुभूतीपूर्वक विचार करेल असं, सुप्रीम कोर्टाने मत नोंदवले होते.सुप्रीम कोर्टाने दिलेले निर्देश न्यायमूर्तींसमोर मांडले जाणार आहेत. त्यानंतर उद्या सकाळी मराठा आरक्षणावर सुनावणी घेतली जाणार आहे.
विनोद पाटील यांची याचिका
मराठा आरक्षण 15 महिन्यांपासून मुंबई हायकोर्टात प्रलंबित आहे. मराठा आरक्षणावर तातडीने सुनावणी करुन तीन महिन्यात निकाली काढण्याची मागणी औरंगाबादचे सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटील यांनी याचिकेद्वारे सुप्रीम कोर्टात केली होती. महत्त्वाचं म्हणजे याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्या भूमिकेला महाराष्ट्र सरकारनेही पाठिंबा दर्शवला होता. मात्र मराठा आरक्षणासंदर्भात मुंबई हायकोर्टात जा, असा आदेश सर्वाेच्च न्यायालयाने याचिकाकर्ते विनोद पाटील यांना दिला होता
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement