एक्स्प्लोर

नगरमध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा, मुस्लिम, धनगर समाजाचा एकत्र मोर्चा

अहमदनगरमधील नेवासा शहरात मराठा, मुस्लिम आणि धनगर समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी भव्य मोर्चा काढण्यात आला. औरंगाबादमध्येही मुस्लिम समाजाने आरक्षणासाठी मोर्चा काढला होता.

अहमदनगर/औरंगाबाद : अहमदनगरमधील नेवासा शहरात मराठा, मुस्लिम आणि धनगर समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. मराठा, मुस्लिम आणि धनगर समाजाने प्रथमच आरक्षणच्या मागणीसाठी एकत्रित मोर्चा काढला. हजारो महिला, पुरूष, विद्यार्थी, वकील, डॉक्टर यांच्यासह मोठ्या संख्येने लोक या मोर्चात सहभागी झाले होते.

अहमदनगरच्या इदगाह मैदानावरून या मोर्चाला सुरुवात झाली. माजी आमदार शंकरराव गडाखही या मोर्चात सहभागी सहभागी झाले होते. आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला मिळायलाच हवे ही मागणी करत हजारोंचा मोर्चा नेवासा तहसीलदार कार्यालयावर धडकला. मोर्चादरम्यान आंदोलकांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आरक्षणाची मागणी केली.

"गेल्या चार वर्षापासून सरकारने जनतेची केवळ दिशाभूल केल्यानं आज राज्यभर आक्रोश सुरू झाला आहे. आता मराठा समाजासोबत मुस्लिम व धनगर समाजही एकत्रित आंदोलनात सहभागी झाला आहे. विविध समाजामध्ये भांडण लावण्याचं षडयंत्र आम्ही उधळून लावणार आहोत", अस गडाख यांनी आपल्या भाषणात म्हटलं.

आंदोलनात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तब्बल दोन तास तहसील कार्यालयावर ठिय्या दिल्यानंतर तहसीलदारांना निवेदन देऊन आंदोलन संपवण्यात आलं.

औरंगाबादेतही आरक्षणाच्या मागणीसाठी मुस्लिम समाज रस्त्यावर औरंगाबादमध्ये मुस्लीम समाजाला पाच टक्के आरक्षण मिळावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. तसेच न्यायालयाने दिलेले पाच टक्के आरक्षण राज्य सरकारने त्वरित द्यावे अशी मागणी देखील करण्यात आली. महाराष्ट्र मुस्लिम अवाम कमिटी संघटनेने हे आंदोलन उभारलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस

व्हिडीओ

Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप
Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेतून 92 लाख लाभार्थी वगळले
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : होर्मुझमधून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, इराणकडून अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले सुरुच
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, ट्रम्प यांची घोषणा  
Team India : टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
INDW vs ENGW: भारताच्या लेकींनी लॉर्डसवर इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, क्रांती गौड, यास्तिका भाटियाची दमदार कामगिरी
भारताच्या लेकींनी इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, लॉर्डसवरील पहिल्याच कसोटीत विजयाचा झेंडा रोवला
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मुंबईतील सिमेंट रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पाची SIT चौकशी करा; अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका, काँग्रेसचा इशारा
मुंबईतील सिमेंट रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पाची SIT चौकशी करा; अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका, काँग्रेसचा इशारा
Embed widget